एकच एक काम एकसारखे करुन माणसाच्या मनाला कंटाळा येतो़ हा कंटाळा घालवण्यासाठी माणसाला काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं करण्याची उर्मी येते़ कधी त्याला शीळ घालाविशी वाटते़ कधी त्याला गाणं गुणगुणावंसं वाटतं़ कधी त्याला रंग-रेषा-आकार खुणावू लागतात़ त्याला चित्र काढाावंसं वाटतं़ गाणं, नाचणं, चित्र काढणं ह्या माणसाच्या मूलभूत अशा आदिम प्रेरणा आहेत़ मध्य प्रदेशातल्या भीमबेट येथे सापडलेली हजारो वर्षांपूर्वीची चित्रे ही त्याची साक्ष आहे़ आहार-निद्रा-भय-मैथुन ह्यांच्या पल्याडचं मनाला क्षणभर विरंगुळा देणारं काहीतरी लागतं़ ज्यामुळे माणसाच्या मनाला नव्यानं उभारी येते़ त्याला आलेला मानसिक थकवा निघून जातो़ मन ताजंतवानं होतं़ मशागतीनंतर पेरणीसाठी जमीन तयार व्हावी तशी मनोभूमी नवसर्जनाकरिता तयार होते़ संगीतकला, शिल्प कला, चित्रकला, वाङमय इ़ चौसष्ट कलांचा जन्म माणसाच्या अशा प्रकारच्या मानसिक निकडीतून झाला़
विरंगुळ्याकरिता छंदांची जोपासना मानवी संस्कृतीच्या इतिहासात हजारो वर्षापासून सुरु आहे़ छंदातून त्यांचे सर्जन झाले़ सर्जनातून मानसिक उर्जेचे व्यवस्थापन झाले़ स्ट्रेस रिलिज मॅनेजमेंट या गोंडस नावाने आलकडे ज्या प्रबंधनशास्त्र किंवा व्यवस्थापन कलेचा बोलबाला ऐकू येतो़ ते आजकालचे नसून अत्यंत पुरातन आहे़ उपयोजनाच्या अंगाने म्हटले तर ही छंदांची योजकता आहे़ छंदोजकता आहे़ जिच्यामुळे मनाला ताजेपणा येतो़ मन रिफ्रेश होतं़ त्याला उभारी येते़ ते नवचैतन्यानं उसळू लागतं़ सकारात्मकतेनं ओतप्रोत भरुन जातं़ शरीराला सक्रिय करतं़ आधक उद्यमशील बनवतं़ कमालीचं उद्योगी बनवतं़ आर्थिक प्रेरणेनं त्याला अर्थार्जनात व्यस्त ठेवतं़ त्याला सर्जनाचा आनंद देतं़ नवनिर्मितीचं पुरेपुर समाधान देतं़ हा सिध्दांत आपल्या पूर्वजांना चांगला ठाउᆬक होता़ जेथे जाल तेथे मन लावून काम करा़ हाती घेतलेल्या कामात मन ओता़ हे काम करायचं तेवढं मनावर घ्या़ काम छोटं-मोठं कोणतंही असेल त्यात आपलं मन रमवा़ कामात इंटरेस्ट घ्या़ म्हणजे तरी काम की त्या कामात मन गुंतवा़ गुंतवणे ह्या क्रियापदाचा एक अर्थ होतो विनियोजन करणे़ इन्व्हेस्ट करणे़ अशा तर्हेने मन इन्व्हेस्ट केलं तर ते आपल्याला चार पैसे मिळवून देतं म्हणजेच मनी देतं असं काम जर आपण मनो-मनी करु शकलो तर माइंड युवर बिझिनेस असं म्हणण्याची कुणाची काय टाप आहे राव ! हा छंद जिवाला लावी पिसे असं गाणं तुम्ही ऐकलं असेल ना त्याच चालीवर आपण म्हणू शकतो हा छंद खिशाला देई पैसे!
गाण्यावरुन आठवलं, गाण्याचं स्थान माणसाच्या आयुष्यात फार मोलाचं आहे़ पोट भरायचं म्हणजे माणसाला चार कष्ट करावेच लागणाऱ शारीरिक किंवा बौध्दिक कुठल्याही प्रकारचे का होईना श्रम करावे लागणाऱ काम करताना गाणं म्हटलं की श्रम हलके होतात़ वीज आणि चक्कीचा शोध लागण्यापूर्वीची गोष्ट़ रामपहाटे उठून खेड्यातल्या बाया दळण दळायच्या, दगडाचं जातं फिरविण्याचे श्रम हलके व्हावे म्हणून त्यांच्या तोंडून आपसुकच गाणं बाहेर पडायचं़ त्याच आपल्या जात्यावरच्या ओव्या, जात्याऐवजी आपण संगणकावर तासनतास काम करतो़ ते श्रम हलके होण्याकरिता एक तर संगणकावर गाणे ऐकत असतो़ किंवा इतर ठिकाणी आपल्या मुखाने गाणे गुणगुणत असतो़ ओठांनी शीळ घालत असतो़
ओठ घुमा
सिटी बजा
सिटी बजा के बोला
ऑल इज वेल
हे इडियट लोकांनी तथाकथित शहाण्यांना अगदी आलकडे सिनेमातून नाही का सांगितलं़ बोले तो कहनेका मतलब इतनाही भिडू के सिटी बजाना जरुरी है समझे?
कानाकानात गेली बाई शीळ
आपल्या मेहकरचे कवी ना़ घ़ देशपांडे यांची एक प्रसिध्द कविता आहे - रानारानात गेली बाई शीळ शीळ घालणे हा तसा पुरुषांचा पराक्रम़ पण एका बाईनं शीळ घालण्याचा आपला छंद जोपासला़ वाढवला़ त्यालाच आपलं करिअर केलं़ आता ही बाई चक्क शीळ घालून गाणं म्हणते़ सोबत आर्केस्ट्रा असतो़ तिकिट लावून जाहीर कार्यक्रम करते़ चांगल्यापैकी बिदागी घेते़ स्त्री-पुरुष समानता मानणारे आम्ही पुरुष मोठ्या आभमानानं म्हणतो, वारे-वा ! याला म्हणतात बाई ! काय सॉलीड शीळ घालते यार ! हाय मरजावा ! थोडक्यात काय की छंदातून आलेली अख्ख्या जगाच्या कानाकोपर्यात गेली बाई शीळ!
संगीताचा नाद
संगीताचा नाद ऐकू आला की आपल्याला त्याचा नाद लागतो़ आपले आयुष्य नादावत जाते़ संगीताच्या स्वरांनी ते सुरेल होउᆬ लागते़ आपलं जगणं तालावर येउᆬ लागतं आणि ही लय एकदा माणसाला साधली की सगळ्या ताण-तणावांचा विस्मय होउᆬन त्याला लई हरीख होतो़
भगवान कृष्णाच्या बासरीनं गोपीकांना वेड लावल्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत़ भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेलया भगवद््गीतेतली प्रबंधकीय तत्वे - मॅनेजमेंट प्रिंन्सिपलच़ देशोदेशीच्या सी़ ई़ ओ़ ना सांगण्यासाठी दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलात फाईव्ह स्टार प्रेझेंटेशन दिल्या जातं़ तेवढीच महत्वाची किंबहुना त्याहुन आधक महत्वाची आहे़ कृष्णाची बासरी़ म्हटलं तर गुराख्याचा पावा, पण साधासुध्या बांबुच्या बासरीनं भारतीय ग्रामजीवन समृध्द केलं आहे़
अशी बासरी वाजविण्याचचा छंद तुम्हाला जडला असेल तर बासरी वादकाचं करिअर तुमच्यासाठी खुलं होतं
संगीताच्या कलेमध्ये गायन, वादन, नर्तन अशा नवीन कलांचा संगम झाला आहे़ सतार, सरोद, सारंगी, संतुर, फिडल, व्हायोलिन, गिटार, किंगरी सारखी तंतुवाद्य असोत की तबला, ढोलक, मृदंग, खंजेरी, डफ, सारखी तालवाद्य असोत की बासरी, क्लॅरिओनेट, सनई, सेक्सोफोन सारखी पुंᆬकवाद्य असोत़ बाजाची पेटी असो की, पियानो जलतरंग असो की राजस्थानी लोक कलाकारांचं काच वाजवणं असो अगदी भजन म्हणणार्या माणसाची वीणा असो की, चिपळ्या आपलं भावजीवन या संगीत साधनांनी समृध्द केलं आहे़
यातलं तुम्हाला काहीही वाजवण्याचा छंद तुम्हाला लागला असेल तर त्याला जपा़ त्याची साधना करा़ त्याला चरितार्थाचं साधन करा़ समजा तुमच्या चरितार्थाचं साधन दुसरं आहे तर मनाच्या विरंगुळ्यासाठी, स्वालाय सुखाय होण्याकरिता त्याला जपा, ही वाया जाणारी गोष्टच नाही़ तुमचं व्यक्तिमत्व विकसित करुन श्रीमंत करणारी ही गोष्ट आहे़ यशाने डोळ्यांची डॉक्टरीण आम सर्जन असलेल्या महाराष्ट्रीयन बाईंच्या कथ्थक नृत्याचा शो पॅरीस मधे होतो़ उपवर तरुण मुलींचे चष्म घालविण्यासाठी आणि त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स बसविण्यासाठी कराव्या लागणार्या ऑपरेशन्स करिता ही बाई प्रचंड उर्जा मिळवते़ ती तिच्या नर्तनकलेतूऩ आता बोला !
तुम्ही म्हणाल की हे आम्हाला कुठं जमतं़ ते ज्याला किंवा जिला जमतं तिलाचं किंवा त्यालाच जमतं़ आमचं तर नेहमीच पालुपद एकच नाचता येईना अंगण वाकडं !
बोलणाराची बोंडं खपतात
काय म्हणता तुम्हाला यातलं काहीच जमत नाही़ शीळ घालता येत नाही, गाता येत नाही, कुठलंच वाद्य वाजवता येत नाही़ ठीक आहे ! ठीक आहे ! काळजी करण्याचं काही कारण नाही़ तुम्हाला कुठलंच वाद्य वाजवता येत नाही म्हणता़ ओके बाबा ओके ! मला फक्त एवढं सांगा तुम्हाला तोंड वाजवता येतं का ? तोंड ? तुम्ही म्हणाल हे काय विचारणं झालं ? माझा उद््देश तसा नाही़ तुम्ही अगदीच मुके आहात असं नाही़ पण तुम्हाला गोड गोड बोलता येतं का? गोड गोड म्हणजे तुमचं बोलणं, तुमचे उच्चार, तुमची भाषा ऐकणार्यांना ऐकतच रहावीशी वाटली पाहिजे़ ऐकणार्यांचे कान तृप्त झाले पाहिजेत़ पुरणाची पोळी़ असली तुपासोबत मनसोक्त सेवन केल्यानंतर पोटाला जसं वाटतं तसं गोड गोड ऐकणार्याच्या कानाला वाटलं पाहिजे़ तुमचे उच्चार शुध्द असतील, भाषेवर प्रभुत्व असेल, बोलण्यामधे ओघवती लय असेल तर कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या संचलनापासून तर रेडिओ जॉकी पर्यंत आणि टी़व्ही़ प्रोग्रामच्या ऍन्करिंगपर्यंतच्या वाटा तुमच्यासाठी मोकळ्या आहेत़ हेही नाही जमले तर जिथे कुठे आणि ज्या प्रकारचा जॉब तुम्ही करत असाल तिथे कलिग्ज पासून तो बॉसपर्यंत तुम्ही तुमच्या भाषेच्या प्रभावाने आपली कामं काढून घेउᆬ शकता़ विश्र्वास संपादन करणे किंवा नम्रतेने नकार देणे तुमच्या बोलण्यातून तुम्हाला जमले पाहिजे़ तुम्हाला लोकांनी गोडबोल्या म्हटले तरी चालेल़ प्रत्यक्ष समोरासमोर संभाषण करणे, फोनवर बोलणे, ग्रुप डिस्कशन मधे सक्रिय सहभागी होणे या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला तुमची भाषा आणि सं शैली कमावली पाहिजे़ यालाच तर कम्युनिकेशन स्किल म्हणतात दोस्त हो ! समजा तुम्ही आठवडी बाजारात टपोर दाण्याची ज्वारी विकायला बसले़ तुमचा माल चांगला आहे पण तुम्हाला गिर्हाईक पटवण्याइतकं चांगलं बोलता येत नाही़ तुमची ज्वारी विकत कोण घेईल? या उलट तुमचा शेजारी़ त्याच्याकडे तुमच्यासारखी चांगली ज्वारी नाही़ त्याच्या ज्वारीमधे बोंड खुप आहेत़ पण तो आतशय बोलका आहे़ गिर्हाईक पटवण्यात वस्ताद आहे़ याची बोंडांची ज्वारी तुमच्या आधी खपून जाईल़ यालाच तर म्हणतात बाप्पा बोलणार्याची बोडं खपतात !
मोतियाचे अक्षर दाणे
गाणं, बजावणं, नाचणं, बोलणं, शीळ घालणं़ या सर्वांशी तुमचं हाडवैर आहे़ पुरानी दुश्मनी आहे़ खानदानी अदावत आहे़ असु द्या़ अजूनही काही बिघडलं नाही़ तुमचं हस्ताक्षर चांगलं असेल तरी ती तुमची संपत्ती आहे़ समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसे कागदावर अगदी मोतियाचे दाणे वाटावे इतकं सुंदर अक्षर तुम्हाला देवानं दिलं़ किंवा ते प्रयत्नपूर्वक तुम्ही कमावलं़ लेखनिकाचा एक जॉब तुमच्याकरिता वाट पाहतोय़ संगणकाच्या वाढत्या प्रसारात हातानं लिहिणं थोडं मागे पडत चाललंय हे खरं़ पण अजूनही अनेक लोकांना लेखनिक लागतो़ माक्या एका कवि मित्राने चक्क राम शेवाळकर, द़ भि़ कुळकर्णी, मारुती चितमपल्ली सारख्या दिग्गज लेखकांकडे सुंदर हस्ताक्षरांच्या भरवशावर लेखनिक म्हणून काम केलं़ तिथे शुध्द लेखनाचे धडे घेतले़ आता गावोगावच्या शाळा-महाविद्यालयात जावून तो मराठी शुध्दलेखनाच्या कार्यशाळा घेतो़ त्यावर भाषणं देतो़ इसको बोलते आम के आम गुठली के दाम ! तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय की, छंदिष्ट व्हा़ छंद कधीही वाया जात नाही़ हा छंद खिशाला देई पैसे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा