माहिती तंत्रज्ञान ही मराठी संज्ञा आलकडे बर्यापैकी रुढ झालेली असली तरी त्याचे मूळ रुप असलेल्या आय टी ह्या इंग्रजी शब्दाची जबरदस्त क्रेझ अजूनही कायम आहे़ महत्वाचे कारण म्हणजे एकविसाव्या शतकातले पहिले दशक संपता संपता उद्योगाच्या क्षेत्रात पॅकेज ह्या शब्दाने सॅलरी हा शब्द रिप्लेस करुन टाकला़ वेतन आणि पारिश्रमिक ह्या शब्दांची तर जणुकाही पत गेल्यासारखी स्थिती झाली़ जैसा देस वैसा भेस ह्या न्यायाने जशी संस्कृती तशी भाषा़ संस्कृती रक्षकांनी मातृभाषेच्या नावाने कितीही राडा केला तरी लोकमानसाने स्वीकृती दिलेले शब्द रुढ होत जातात आणि त्या शब्दांच्या उपयोजनाने नित्यनुतन होत जाणारी भाषा त्या कालखंडाचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करीत असते़ या युगाच्या सर्व मानवी व्यवहारांनी ती चलनी भाषा असते़
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कंम्प्यूटर, इंटरनेट, वेबसाईट, ई-मेल या शब्दांनंतर आतशय लोकप्रिय होउᆬ लागलेला शब्द म्हणजे ब्लॉग़ कोट्यावधी युवा दिलाची धडकन असलेल्या आमताभ बच्चन, आमिर खान, नाना पाटेकर, प्रियंका चोप्रा, सारख्या सेलिब्रिटीजनी जगाच्या पाठीवर कानाकोर्यात असलेल्या आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याकरिता ब्लॉग चा उपयोग केला आणि या माध्यमाला कमालीची प्रतिष्ठा मिळवून दिली़ ऍड कॅंम्पनेच एक भाग म्हणून एकीकडे नवीन चित्रपटाची वेबसाईट जशी लॉंच होउᆬ लागल्या तसेच दुसरीकडे नव्या उत्पादनाची प्रसिध्दी करणारे ब्लॉग्ज धडाधड उघडू लागले़ जाहिरातीच्या ह्या नव्या तंत्रज्ञानाने उद्योजकांना एक अनोखी सिध्दी प्राप्त करुन दिली़ आणि नाही बिलकुल मुपत्त़ नो बिल पेमेंट नो कमिशऩ एकदम कॉस्टलेस़ ये इंटरनेट है मेरी जाऩ आत्मा म्हणतात सफेद जादू़
ब्लॉग्ज सोबतच्या उद्योजक आपल्या उत्पादनांच्या सेवांच्या जाहिरातीकरिता आपली स्वतःची वेबसाईट प्राध्यान्याने लॉंच करतात़ त्याशिवाय गुगल, याहू, रोज मेल सारख्या नामवंत सर्व्हरला आपल्या जाहिराती देतात़ याहू, रेडिफमेला या कंपन्या त्यांच्या ई-मेल सेवेमध्ये त्या जाहिराती प्रदर्शित करतात़
ब्लॉग ही गुगलची खास ब्लॉग निर्मितीकरिता उपलब्ध करुन दिलेली सेवा आहे़ या सेवेमधे ब्लॉगस्पॉट डॉट कॉम़ ह्या डोमेला मार्फत कोट्यावधी ब्लॉग्स गुगलने उपलब्ध करुन दिलेले आहेत़ गुगलने स्वीकारलेला जाहिराती ऍंड सेंस द्वारा या ब्लॉग्जवर लावल्या जातात़ ब्लॉग वाचकांनी जाहिरातीवर क्लीक केल्यास प्रत्येक क्लीक मागे एक ठराविक रक्कम ब्लॉग धारकांच्या खात्यात गुगल जमा करते़ त्याकरिता ब्लॉग जगभरातल्या कुठल्या भाषेत लिहिल्या जातो़ कोणत्या देशातले लोक ब्लॉगला आधक भेटी देतात़ म्हणजे दररोजचा ह्या ब्लॉगवर व्हिजिटर्सचा ट्रफिक किती आहे़ अशा निकषांवर तपासूनच गुगल ब्लॉग्जवर जाहिराती देते़ गुगलच्या जागतिक भाषांच्या यादीमधे सध्यातरी फक्त हिन्दी या एकमेव भारतीय भाषेचा शोध समावेश केलेला आहे़ हिन्दी दिवसाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या एका लेखामधे जगभरात हिन्दी बोलणार्या समजणार्यांची संख्या इंग्रजीपेक्षाही जास्त असल्याचे म्हटले आहे़
ब्लॉग्जच्या दुनियेत मात्र हिन्दी खूपच मागे पडलेली दिसते़ एका आकडेवारीनुसार इंटरनेटवरील एकुण ब्लॉग्जची स्थिती
एकूण ब्लॉग्ज ९़७२ कोटी
भाषा
जापानी
इंग्रजी
हिन्दी
संख्या
३़६ कोटी
३़५ कोटी
३,५००
टक्केवारी
३७%
३६%
़००००३६%
प्रस्तुत आकडेवारी दोन वर्षांपुर्वीची आहे़ आज ब्लॉग्जची संख्या भाषानिहाय वाढलेली असेल पण प्रतिशत प्रमाणात फारसा बदल संभवत नाही़
या ब्लॉग विश्वात मराठी भाषेचे स्थान काय? असा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात येणे अग्ादी स्वाभाविक आहे़ आज मराठी भाषेतील ब्लॉग्जची संख्या सुमारे १६०० आहे़ म्हणजे ती हिन्दीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहे़ याला सगळ्यात मोठे कारण म्हणजे हिन्दी-मराठी भाषांची देवनागरी लिपी़ इंग्रजी फॉंटसचा डिस्प्ले जगभरातल्या कोणत्याही कम्प्यूटरवर आणि कोणत्याही प्रणालीत उपलब्ध होतो़ देवनागरी आणि इतर भारतीय भाषांच्या लिपीचे फॉंटस डिस्प्ले करणारे युनिकोड फॉंटस आलकडे आस्तत्वात आले़ तो येण्याअगोदर मोबाईलमधे एसएमएस लिहिण्यासाठी रोमन इंग्रजीचा जसा उपयोग होतो तसाच इंटरनेटवरही होत होता़ युनिकोड फॉंटसचा उपयोग करणारांची संख्या आज झपाट्याने वाढते आहे़ त्यामुळे ब्लॉग्जच्या दुनियेत हिन्दी-मराठीसह भारतीय भाषांना चांगले दिवस येतील यात शंकाच नाही़ देवनागरी करिता उपभोगात येणारा मंगल या फॉंटच्या प्रसिध्द प्रयोगशील चित्रकार दिवंगत ऱ कृ़ जोशी या मराठी माणसाने लावल्या़ हे वाचून तुमचा माझा उर आभमानाने भरुन यावा आणि ओठावर सहजपणे बोल उमटावे मराठी पाउᆬल पडते पुढे़
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा