माननीय आ़ सुधाकर भाऊ,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या विषयीच्या माक्या भावना मी व्यक्त करतो आहे़ हे एक अनौपचारिक शुभेच्छा पत्र मी त्यासाठीच लिहितो आहे़
साहित्य, व्रᆬीडा, राजकारण-क्षेत्र कोणतंही असो पण त्या क्षेत्रात काम करतांना
नजर आसमाँपर
और पाँव जमींपर ।
अशी माणसं भेटली की मला ती आवडतात़ तुमच्यातली देखील नेमकी हीच गोष्ट मला आवडली आहे़ अन्यथा माक्यासारख्या निरुपद्रवी माणसाची एवढी आस्थेवाईकपणे चौकशी तुम्ही केली नसती़
महंमदावर पोवाडा रचणार्या महात्मा पुᆬल्यांची वैश्विकता तर फार दूरची गोष्ट इथे आम्ही आमच्या समाजालाच छोट्या-छोट्या तुकड्यात वाटले आहे़ डबक्यांचे आणखी छोटे छोटे डबके करून टाकले आहे़ इतर मागास वर्गीयांना आणखी मागासलेला ठेवणारा हा विचार जोवर आम्ही झटवूᆬन टाकत नाही तोवर दूरितांचे तिमिर' दूर होणार नाही़ याविषयी तळमळीने बोलतांना तुम्हाला पाहिले की मी माक्या निराश मनाला समजावतो अन् म्हणतो-
्रीीि ैज र्जसी र्रॅी़
एवढ्यातच महात्मा पुᆬल्यांचा आसूड' असा खुंटीवर टांगून चालणार नाही़
साहित्य लेखनाच्या क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षापासून मी माक्यापरीने थोडीफार धडपड केली आहे़ पण साहित्यातल्या राजकारणाशी माझा काही सूर जुळला नाही़ पण ज्यांना ते जमतं त्यांच्याविषयी मला आदर आहे़ मला आठवतं १९८१ साली अकोल्यात आखल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं़ त्याच्या कोषाध्यक्ष पदाची धुरा तुम्ही समर्थपणे सांभाळली होती़
लगेच १९८२ ला अकोल्यात आखल भारतीय नाट्यसंमेलन भरलं होतं़ त्याचे तर तुम्ही स्वागताध्यक्षच होतात़ त्यात स्वागताध्यक्ष म्हणून तुम्ही केलेलं भाषण रसिकांच्या अजूनही चांगलंच लक्षात आहे़
एका संमेलनात मी कविता वाचन केले होते तर दुसर्याचे स्वागत गीत लिहिले असल्याने तुमच्या कार्यशैलीचा जवळून परिचय झाला़
आपल्या माणसांशी, परिसराशी असलेली तुमची नाळ घट्ट आहे़
सातपुड्यातल्या वनसंपत्तीचा शोध घेतला पाहिजे़ त्यात सापडणार्या खनिज संपत्तीचा तपास लावण्या करिता मिनरल सर्वे केला पाहिजे़ मेळघाट परिसरात बॉटनीकल गार्डन स्थापन केला पाहिजे़ आणि आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्र स्थापन केले पाहिजे़ अशा कितीतरी गोष्टींचा पाठपुरावा करताना तुम्हाला पाहिलं की वाटतं या माणसाला इथल्या निसर्ग संपत्तीची केवळ जाणच नाही तर तिच्या उपयोगाचे सर्वंकष भानही आहे़
पान खायो सैयाँ हमारो
मलमल के वुᆬर्ते पे छिंटे लाल लाल'
असे गाणे गुणगुणावे आणि चोची रंगली की इकडे तिकडे पिचकार्या मारत रांगोळ्या काढाव्या एवढीच काय ती आमची विड्याच्या पानाशी दोस्ती़ पण तुमच्या डोक्यात येईल ते वेगळचं़
आपल्या परिसरात पानमळे खूप आहेत़ त्याची फार मोठी बाजारपेठ आहे़ अनेकांचे संसार त्यावर चालतात़ परंपरागत पद्धतीने चालणार्या पानमळा, पानपिंपरी शेतीचा विकास झाला पाहिजे़ तो उद्योग म्हणून वाढीस लागला पाहिजे म्हणून तुम्ही अथक प्रयत्न केलेत़ आणि त्यातून मग साकारले दिवठाण्याचे पानमळा संशोधन केंद्ऱ अशा कितीतरी गोष्टी़
आम्ही नरनाळयाचा किल्ला पहायला जाऊ़ एका दिवसाची सहल करून छान आऊटिंग झाले' म्हणून परत येऊ़पण पर्यटन केंद्र म्हणून नरनाळा विकसीत झाले पाहिजे़ एवढेच नव्हे तर तेथे एक जलविद्युत केंद्र निर्माण करून सातपुड्याचा निसर्गरम्य माहोल विद्युत रोषणाईने लखलखीत करण्याचे स्वप्न मात्र तुम्हालाच पडू शकतं़ कधी तुम्हाला व्ााटेल वान नदीचं पाणी अडवलं पाहिजे़ त्यासाठी धरण बांधलं पाहिजे़ इथल्या शेतीच्या पाटापाटातून ते पाणी खेळवलं पाहिजे़ आणि हा सगळा परिसर हिरवागार केला पाहिजे़ तो प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून शासन दरबारी हेलपाटे तर घेतलेच पाहिजेत पण वारीच्या जागृत हनुमानाला साकडंही घातलं पाहिजे़ ह्याची नम्र जाणीव ज्या माणसाला आहे त्याला काय कमी पडेल?
आदिवासींच्या लोकगीतांचा मी अभ्यास केला़ त्यांचा जीवनानुभव शब्दबद्ध करणार्या कविता लिहिल्या़ त्यासंदर्भात वाचन करतांना केंद्र सरकारच्या माडा' योजनेविषयी वाचलं होतं़ पण ती योजना स्वीकारण्यासाठी आदिवासी लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे म्हणून खिरवुंᆬड, वस्तापूर, पोपटखेड, वारी, भैरवगड या दुर्गम भागात आदिवासींचे मेळावे आयोजित करणे़ संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्याची माहिती देणे अशा कामात तुम्हाला गुंतलेलं पाहिलं की तुमच्याविषयीच्या आभमानानं ऊर भरुन येतो़
आपल्या तालुक्यात पिकणार्या पांढर्यासोन्याचं चीज झालं पाहिजे़ आणि हजारेक लोकांना पोट भरण्याचं साधन उपलब्ध झालं पाहिजे़ म्हणून सूत गिरणीची कल्पना तुम्ही राबविली़
ओबीसींवर अन्याय करणारा अलीकडचा न्यायालयाचा निकाल ऐकला की तुम्हाला पुन्हा एकदा संघर्षासाठी नव बळ येतं़ आणि त्यातूनच मग महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीची स्थापना होते़ तिच्या अध्यक्षपदाची सूत्र तुम्ही हाती घेता़ आणि न्यायासाठी एका नव्या संघर्षाला सर्व शक्तिनिशी सामोरे जाता़ आणि मला आठवतो माक्या गझलचा एक मतला-
हा प्रश्न एकदाचा लावा धसास राजे;
टांगून ठेवलेले त्याला कशास राजे़'
तुम्ही मंत्री पद भूषवलं, डझनावर पदं उपभोगली़ इजिप्त मधल्या आलप्त राष्ट्रांच्या जागतिक युवा विद्यार्थी परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं़ निर्यात वाढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी जपान, हाँगकाँग, सिंगापूरला भेट दिली़ आखल भारतीय काँग्रेस कमेटीच्या आधवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत भ्रमण केलं़
आणि घरी आलेल्या तळागाळातल्या माणसाच्या मनात आपलेपणाने घरही केलं़
हे सगळे करण्यासाठी हजारो माणसे लागतात़ ती वेगवेगळ्या जातीची असतात़ अलग-अलग धर्माची असतात़ विविध स्वभावाची असतात़ त्यांची मने सांभाळणे आणि त्यांना जोडून ठेवणे एका सूत्रात बांधून ठेवणे याशिवाय थोडेच ते शक्य होते़
एका निखळ माणुसकीच्या धाग्यातच ती ताकद आहे़ तिला तुम्ही फार चांगलं जोखलं आहे़ पारखलं आहे़ शुभेच्छा देण्याकरिता कवीजवळ शब्दांशिवाय दुसरं काय असतं़? तुमची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसातला देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो़ एवढीच एक प्रार्थना फिराक गोरखपुरीच्या शब्दांनी तुमच्यासाठी -
जिन्हे शक हो वो करे और खुदाओकी तलाश,
हम तो इन्सान को दुनिया का खुदा कहते है ।'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा