एक काळ असा होता की, जगभरातल्या कॉमन मॅनचं एक स्वप्न होतं की त्याची स्वतःची मोटर कार असली पाहिजे़ आपल्या आर्थिक कुवतीनुसार मग ती सेकंड हॅंड का असेना चालेल पण घेउᆬन टाकू एकदाची़ अशी सेकंडहॅंड कार विकत घेणार्या कॉमन मॅनची फटफजिती प्रख्यात व्यंगचित्रकार आऱ के़ लक्ष्मण यांनी त्यांच्या कथेत छान रेखाटली आहे़ दूरदर्शनवर आपण ती कथा वागळे की दुनिया मधे पाहिलीही असेल़
आज काळ बदलला़ कॉमन मॅनची नवी जनरेशन आली़ निम्न मध्यमवर्गाचा उच्च मध्यमवर्ग झाला़ त्याच्या खिशात चार पैसे खुळखुळायला लागले़ दुसरीकडे मार्केटिंग मध्ये पाउᆬच पॅकचा जमाना आला़ वस्तु छोट्या छोट्या करुन विकल्या तर रिटेल मधे फार मोठा नफा कमावता येउᆬ शकतो हे उत्पादकांनी हेरले़ कॉमन मॅनच्या बजेट मधे बसेल असे मोटर कारचे पाउᆬच पॅक रतन टाटांनी बाजारात आणले - नॅनो़ और कॉमन मॅन का मोगॅम्बो खुश हुआ !
पुण्यात उत्पादित होउᆬ घातलेल्या नॅनोचं उत्पादन स्थळ महाराष्ट्राबाहेर घालवणारं एक महाभारत उद्योग क्षेत्रात घडलं आणि नॅनो या शब्दाला आणि टाटांच्या उत्पादनाला अफाट प्रसिध्दी मिळाली़ पण ग्यानबाची मेख अशी आहे की टाटांच्या नॅनो चा आणि नॅनो तंत्रज्ञानाचा संबंध केवळ नाममात्र आहे़ आकारापुरता आहे़
नॅनो हा तसा मुळ ग्रीक भाषेतला शब्द़ त्याचा अर्थ होतो ठेंगणा़ गुजराती भाषेत दोन शब्द आहेत नानू आणि नल्लो आणि त्यांचा अर्थ होतो लहाऩ आणि म्हणूनच कदाचित उत्पादित होण्यासाठी नॅनो गुजरातमध्ये गेली असावी की काय? अशी शंका मनाला उगीच चाटून जाते़ नॅनो म्हणजे अत्यंत सूक्ष्म कण़
पदार्थाच्या सूक्ष्म कण म्हणजे अणू़ अणूचा अती सूक्ष्म भाग म्हणजे परमाणू आणि परमाणूचा अत्यंत सूक्ष्म भाग म्हणजे नॅनो़ पदार्थाची घनता मोजण्यासाठी आपल्याकडे जे माप आहे ते मिटऱ एका मिटरचा एक अब्जावा भाग म्हणजे नॅनो मिटऱ उतरत्या क्रमाने जाणारे हे माप आहे़ ज्या अत्यंत सूक्ष्म कणाचा व्यास एक अब्जांश मिटर आहे तो नॅनो़ हा नॅनो अत्यंत सूक्ष्म असतो म्हणजे किती सूक्ष्म असतो? हे आपल्याला नेहमीच्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या डोक्याच्या एक केसाचा जेवढा व्यास असेल त्याच्या जवळजवळ पन्नास हजारावा भाग म्हणजे नॅनो़ विज्ञानानं अक्षरशः बाल की खाल काढत हा नॅनो कप शोध घ्या आणि या नॅनो कणावर आधारलेलं जे तंत्रज्ञान जन्माला आलं ते म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी़
नॅनो टेक्नॉलॉजी
१९७४ मध्ये टोकियो विज्ञान विद्यापीठाच्या प्रोफेसर नोरिओ नानीगुची यांनी नॅनो टेक्नॉलॉजी ह्या संकल्पनेची व्याख्या केली़ या व्याख्येला नॅनो टेक्नॉलॉजीची पहिली व्याख्या मानली जाते़ प्रोफेसर नोरिओ यांच्या मते नॅनो टेक्नॉलॉजी कन्सिस्टस ऑफ प्रोसेसिंग ऑफ सेपरेशन, कन्सॉसिडेशन ऍण्ड डिफॉमेशन ऑफ मटिरिअल्स बाय वन ऍटम ऑर वन मॉलिक्यूल़
नॅनो टेक्नॉलॉजीची आणखी एक प्रचलित व्याख्या आहे़ आशयाच्या दृष्टीने ती मला आतशय समर्पक, सर्वसमावेशक आणि आधक परिपूर्ण वाटली ती अशी - एखाद्या वस्तूच्या सूक्ष्म अणूंबद््दल माहिती मिळविण्यासाठी व त्यांचेवर नियंत्रण मिळवून त्यांच्या आतापर्यंत माहीत नसलेल्या गुणधर्मांचा उपयोग करुन नवनवीन उपयुक्त वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञाऩ
नॅनो टेक्नॉलॉजी ही भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आभयांत्रिकी अशा चार ज्ञानशाखांवर आधारित असल्याने तिचे क्षेत्र हे इन्टर डिसिप्लिनरी क्षेत्र आहे़ नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये प्रामुख्याने तीन विभाग पडतात १़ नॅनो मटेरियल्स २़ नॅनो इलेक्ट्रॉनिक्स ३़ नॅनो ब्ाायोटेक्नॉलॉजी़ दैनंदिन वापराच्या वस्तू पासून तर अंतराळ संशोधनापर्यंत मानवी जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही की जिथे या नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग होणार नाही़ नॅनो मटेरियल्स हे वजनाने आतशय हलके, मजबूत आणि पारदर्शी असतील़ ज्यामुळे कमीतकमी जागेवर आपल्याला कारखाना उभारणे शक्य होईल आणि तो संचालित करण्यासाठी लागणारी उर्जाही कमीत कमी असेल़ या कारखान्यातून निर्माण होणारी उत्पादने मात्र अत्यंत मजबूत असतील आणि आजकालच्या आधुनिक दुनियेतल्या स्लीम इज ब्युटी या सौंदर्य तत्वानुसार त्या उत्पादीत वस्तुची जाडी ही जनरेशन बाय जनरेशन कमीत कमी होत गेलेली असेल़ भविष्यकाळात आवश्यकतेनुसार वस्तुची पुनर्रचना करण्यापर्यंत आपण मजल गाठू शकणार आहोत़
किशोर कुमार यांनी आभनय केलेला एक जुना हिंदी सिनेमा होता़ त्यचं नाव श्रीमान फण्टुश या सिनेमात किशोरकुमार चुकीने कुठलंतरी औषध पितात त्यामुळं त्यांचा आकार लहान लहान होत जातो़ तो एवढा लहान होतो की, किशोरकुमार यांची अगदी एवढुशी प्रतिमा चक्क नायिकेच्या तर्जनीवर चालताना ट्रिक फोटोग्राफीने दाखवली होती़ अशीच काहीशी किमया उत्पादित वस्तुंच्या आकारमानाच्या बाबतीत नॅनो टेक्नॉलॉजी प्रत्यक्ष करुन दाखवणार असे वाटते़ संगणक, टेलिकम्युनिकेशन, सौर उर्जा, पर्यावरण, एरोस्पेस इंजिनियरिंग अशा विविध क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजीमुळे कमालीचे बदल संभवतात़ आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणार्या वस्तुंचे स्वरुप विश्र्वास बसणार नाही इतके बदलून गेलले असेल़
नॅनो गारमेंटस
एक नूर आदमी दस नूर कपडा, जैसा देस वैसा भेस, सर सलामत तो पगडी पचास, फाटेपर्यंत ताणू नये असे सगळे वाक्प्रचार आणि म्हणी कितीतरी मागे पडलेल्या असतील अशी रुपकांती धारण केलेली परिधानं आपल्या फॅशन विश्र्वात प्रवेश करणार आहेत़ रोजच्या वापरात असलेल्या कपड्यांकडून आपल्या जेवढ्या म्हणून अपेक्षा असतील त्याहून कितीतरी पटीने आधक गुणाचे हे नॅनो गारमेंटस असतील़ अगदी ह्या गुणधर्मांची यादीच द्यायची झाली तर -
१़ टिकाउᆬपणा-
कार्बन नॅनो ट्युब्जपासून बनवलेले धागे स्टीलच्या वीसपट आणि स्पायडर सिल्कपेक्षा चार पट मजबूत असतात़ म्हणजे नॅनो गारमेंटस वापरुन वापरुन तुम्हाला कंटाळा येईल पण ते फाटण्याचं नाव घेणार नाहीत़ सहजासहजी त्याला साधा खोसाही लागणार नाही़ नॅनो गारमेंटस अत्यंत तलम, हलके आणि जास्त काळ टिकणारे असतील़
२़ टिंकल फ्री -
ही नॅनो गारमेंटस आपण कशीही वापरली तरी त्यावर वळ््या पडणार नाहीत़ चुण्या दिसणार नाहीत़ म्हणजे त्यांना इस्त्री करण्याचे कामच पडणार नाही़ तुमचा वापर किती रफ असला तरी ती तुम्हाला पुरुन उरतील एवढी टफ असतील़
३़ ऍलजी लेस -
नायलॉन टेरोलीन सारख्या कापडाची बर्याच लोकांना ऍलर्जी असते़ काहींना त्यामुळे त्वचा रोग होतात़ नॅनो गारमेंटस मध्ये चांदीच्या कणांचा समावेश असलेले धागे असतात़ ज्यामुळे त्वचा रोगाला कारणीभूत असलेले जीवाणूंना प्रवेशबंदी करता येते़
४़ ऑक्सिरिच ऍण्ड आइसटच -
रेडिमेड कपडे निर्माण करणार्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीने असा एक शर्ट तयार केला की त्याला परिधान केल्यावर आपल्या शरीराभोवती ऑक्सिजन रेणू फिरतील त्यामुळे तुम्हाला कायम ताजेतवाने वाटत राहील़ त्यांच्या या बॅंडचे नाव आहे ऑक्सिरिच
दुसरा असा शर्ट तयार केला की त्याला परिधान केल्यावर शरीराला थंडावा मिळेल़ त्यांच्या या बॅंडच नाव आहे आइस टच़
अर्थात अशा शर्टस्च्या खरेदीकरिता आपल्याला पैसेही तसेच मोजावे लागणार आहेत़
४़ डाग, धूळ, वास विरहित-
आपल्या शर्टच्या कॉलरी, कफ ह्या हमखास मळतात़ धुळ बसली की कपड्यांमधे ती थांबली जाते़ कधीतरी चहाचा, पानाचा, शाईचा डाग पडतो़ दवाखान्यातून भरती असलेल्या पेशंटला भेटून आले की कपड्यांनी दवाखान्यातल्या फिनाईल, औषधांचा वास शोषून घेतलेला असतो़ हे सर्व नॅनो गारमेंटस मधे टाळले जाउᆬ शकते़ नॅनो गारमेंटस हे डाग, धुळ, वास विरहित असतील़
वॉशिंग मशिनच्या यंत्रावर सिल्व्हर नॅनो मटेरियलचं कोटिंग दिलं तर कपड्यातील दमटपणा लवकर कमी होउᆬ शकतो़
एक पोस्टाचे तिकिट आणि पंचवीस दशलक्ष पृष्ठे
तंत्रज्ञानाने केलेल्या माहितीच्या प्रस्फोटाने एकविसाव्या शतकाचा प्रारंभ झाला़ माहिती तंत्रज्ञान हा आजचा परवलीचा शब्द झाला़ त्याने आपले जीवन सर्वांगाने व्यापून टाकले़ अशा माहिती तंत्रज्ञानाला पर्यायाने आपल्या जीवनाला नॅनो टेक्नॉलॉजीचे चमत्कार पराकोटीने प्रभावित करणार आहेत़ उदाहरणार्थ, ज्याच्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही असा आपला संगणक़ एकीकडे हार्ड ड्राइव्हचा आकार लघुत्तम करणे आणि दुसरीकडे तितक्या वेगात आणि क्षमतेत महत्तम वाढ करणे नॅनो टेक्नॉलॉजीने शक्य होणार आहे़ सध्या त्याची हार्डडिस्क पोस्ट कार्डाएवढी आहे़ तिचा आकार पोस्टाच्या एका तिकिटाएवढा होईल़ आणि या पोस्टाच्या तिकिटाएवढ्या मेमरीत किती मजकूर बसेल? चक्क पंचवीस दशलक्ष छापील पृष्ठे ! विश्वास नाहीना बसत ! नॅनो टेक्नॉलॉजीचे चमत्कार असे आवश्र्वसनीयच असणार आहेत़ मिलीपीड नावाची अशी मेमरी झुरीक मधे आयबीएम कंपनी तयार करते आहे़ यापुढची पायरी म्हणजे नॉन व्होलाटाइल कॉम्प्यूटर मेमरी बनविण्याचे प्रयत्न चालले आहेत़ ज्याला हार्ड ड्राइव्हची आवश्यकताच राहणार नाही़ ज्यात वीज नसतानाही माहिती साठलेली राहील़
भारताचे नॅनो मेडिसिन
भारतातील काही फार्मासिटिकल कंपन्यांनी नॅनो मेडिसिनची निर्मिती केली़ जीआरटी म्हणजेच जिन रिपेअर थेरपी मधे संशोधन करुन औषध निर्मितीचे पेटंट एका प्रसिध्द कंपनीने मिळवले़ एडस् आणि कॅन्सर सारख्या रोगांवर नियंत्रण मिळविणे त्या औषधांमुळे शक्य होईल असा त्या कंपनीचा दावा आहे़ कॅन्सरवर उपचार करण्याकरिता नॅनोक्झेल हे इंजेक्शन दुसर्या एका प्रथितयश उद्योग समुहाने तयार केले़ टीबी आणि टायफाइड या रोगांचे निदान करण्यासाठी केन्द्र सरकारच्या डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने उपकरणे तयार केली आहेत़
नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधारे करीत असलेल्या प्रगतीची बायोटेक्नॉलॉजीची दिशा तर अफलातून आहे़ ज्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्समधून औषध देणे, नॅनो बुलेटस किंवा नॅनो बॉम्बचा उपयोग करुन शरीरातील ट्युमर काढणे, नॅनो कॅमेर्याच्या डोळ्यांनी शरीरातील पेशींच्या अंतर्गत भागाचा मुआइना करणे, नॅनोटेकच्या लहानशा प्रोबने आरोग्याची देखभाल करणे, गरज पडल्यास एखाद्या नवीन अवयवाची निर्मिती करणे अशा कितीतरी गोष्टी शक्यतेच्या परिघात येउᆬ घातल्या आहेत़
अमेरिकन भविष्यवाणी
तंत्रज्ञान क्षेत्राच्या भविष्यवाणीकरीता प्रसिध्द असलेले अमेरिकन शास्त्रज्ञ रे कुर्जविल यांनी असे भाकित केले आहे की, २०२९ पर्यंत मनुष्याला अमर करण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल़ मानवी शरीर पाषाण काळातील सापत्टवेअरला रिपोग्राम करु शकेल़ असे तंत्रज्ञान वीस वर्षांच्या अल्पावधीत आस्तत्वात येईल़ मानवी शरीराला म्हातारं होण्यापासून आपल्याला रोखता येईल किंवा त्याला पुन्हा तारुण्य प्रदान करता येईल़ तेव्हा नॅनो टेकने माणसाला अमरत्वाचे वरदान दिलेले असेल़ तेव्हा पुन्हा तारुण्य प्राप्त करणार्या ययातीची कथा प्रत्यक्षात अवतरलेली असेल आणि ययातीचा पुत्रही त्यामुळे म्हातारा न होता तोही तरुणच राहिलेला असेल़ नॅनो टेक्नॉलॉजीच्या विकासाचा हा वेग बघता इ़स़ २२५० च्या आसपास मानवी शरीर आणि मेंदूच्या सूचनांची बॅकअप कॉपी नॅनो टेक्नॉलॉजीने आपल्या हातात ठेवलेली असेल़ तेव्हा खर्या अर्थाने मानव अमर होईल़ एक मिनिटात एक पुस्तक लिहिण्याएवढे प्रचंड सामर्थ्य माणसाच्या बुध्दिमत्तेत येउᆬ शकेल़ एक संकल्पना आहे व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तव़ ह्या आभासी वास्तवात मानवी मेंदूतील संकेत बंद करणे आणि इच्छित स्थलकालात मानवाला घेउᆬन जाण्याचे काम नॅनोबोटस करु शकतील़
नॅनोटेकचे सामाजिक उत्तरदायित्व
वैज्ञानिक प्रगती ही दुधारी तलवारीसारखी असते़ तिचे जसे काही फायदे असतात़ तसेच काही तोटे ही असतात़ नॅनो कण आकाराने लहान असले तरी फार मोठ्या क्षेत्रफळावर ते रासायनिक व जैविक प्रक्रिया करीत राहतात़ सौंदर्य प्रसाधने, रंग यामध्ये नॅनोकणांचा उपयोग करण्यात येतो़ श्र्वासातून किंवा किंचित उघड्या जखमेतून हे नॅनोकण शरीरात प्रवेश करतात़ हाड जोडण्यासाठी ऑपरेशन करुन सळ्या, स्क्रू शरीरात बसवावे लागतात़ हार्ट पेशंटच्या शरीरात पेसमेकर बसवावे लागतात़ ह्या वस्तूंमधील नॅनोकण शरीराच्या अंतर्गत प्रक्रियांमधे अडथळे निर्माण करतात़
ऍण्टिबायोटिक्स औषधे ज्याप्रमाणे शरीरातील कामाचे-बिनकामाचे सर्व जीवजंतू एकाच वेळी मारुन टाकतात़ तसेच नॅनो सिल्व्हर कण पाणी फिल्टर करताना घटक उपयुक्त अशा दोन्ही प्रकारचे सूक्ष्मजीव नष्ट करतात़
नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार झालेल्या उत्पादनाकरिता काही नियम तयार करुन जनतेच्या आरोग्याचे रक्षण केले पाहिजे़ अशा तर्हेचे नियंत्रण उत्पादकांवर ठेवण्याकरिता अमेरिकेमध्ये यु़एस़ फुड ऍण्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, यु़ एस़ एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी, हेल्थ ऍंड कन्झुमर प्रोटेक्शन डायरेक्टोरेट ऑफ दि युरोपियन कमिशन अशा संस्थांनी पुढाकार घेतला़
भारतामध्ये हे तंत्रज्ञान वापरणार्या उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीत, माहिती पत्रकात आणि लेबलांवर नॅनोकणांचा उपयोग केलेला असल्याचा आणि सुरक्षिततेच्या पातळीचा उल्लेख स्पष्टपणे करावा असे आदेश संबंधीत सरकारी यंत्रणांनी देण्याची गरज आहे़ तसेच उपभोक्ता असलेल्या जनतेला यादृष्टीने जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न आतापासूनच झाले पाहिजेत़ तरच आपला भविष्यकाळ निरामय राहील़.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा