माझ्या समोर एक कविता आहे -
कांच के गिलास़
चोवीस-पंचवीस वर्षापूर्वी मी ती पहिल्यांदा ऐकली होती, ती आमचे मित्र किशोर मोरे यांच्या तोंडूऩ आणि नंतर शांततेनं ती वाचली होती ती त्यांच्याच डायरीत़ परवा त्यांच्या डायरीतून माक्या डायरीत मी ती उतरून घेतली़ शांततेनं वाचली़ आमचे पुपाजी (पुरूषोत्तम पाटील संपादक: कविता-रती) म्हणतात तशी अगदी सावकाशपणे चघळून चघळून चाखत-माखत वाचली़. पंचवीस वर्षानंतर तिचा प्रभाव आजही तसूभर देखील कमी झालेला नाही़ उलट वेगवेगळ्या तर्हेनं, वेगवेगळ्या अंगानं ती नित्यनूतन वाटत राहिली़ तिच्यातला एखादा शब्द, एखादं विशेषण, एखादं व्रिᆬयापद पूर्वीपेक्षा फार वेगळ्या अर्थछटेनं मनाला भिडत राहिलं़
पंचवीस वर्ष हा तसा काही लहान-सहान कालखंड नाही़ पंचवीस वर्षात अवतीभवतीचं जग किती वेगानं बदललं, कितीतरी सरकारं आली अन गेली़ माणसाचं राहणीमान, बदललं, माध्यमांनी आपली रूपं बदलली़ खेड्यातल्या अस्सल मराठमोळ्या भाषेच इंग्रजीनं घुसखोरी करून दोनचार शब्दांचं का होईना, पण माणसांच्या जीभेवर आपलं आसन पक्क केलं़ टी़ व्ही़ आला तो रंगीत झाला़ संगणक आला, दुकानात बसला़ माणसांच्या खाण्या-पिण्याची, वागण्याची-बोलण्याची रीत बदलली़ त्यांची आभरूची बदलली़ काय नाही बदललं? सगळं काही बदललं़ एवढ्या अदला-बदलीत ही एखादी कविता मात्र शब्दाआधी झोंबिजे प्रमेयासी या न्यायाने जशी पंचवीस वर्षापूर्वी मनाला लागली होती- भावली होती भिडली होती-रूतली होती- खरं तर एवढ्या सगळ्या व्रिᆬयापदानंतरही थोडंफार शिल्लक राहातं, ते ज्ञानेश्वर माऊलींच्याच शब्दात बसू शकतं तो शब्द म्हणजे झोंबली होती़ तशीच ती किंबहूना त्यापेक्षाही आधक तीव्रतेने ती आज झोंबते माणसा-माणसात निर्माण होणार्या मैत्रभावाच्या उपचारावर ती नेमकेपणाने बोट ठेवते़ आणि एकप्रकारे आपली दुखरी नस' पकडते़ तेव्हा कळवळल्याशिवाय दुसरे काहीच आपल्याला करता येत नाही़ अर्थात हा कळवळा लाभाविण प्रीती करणारा' संवेदनशील असला तरच, नाहीतर दगड मनाला'' जिवाला लागलेल्या कळा' सांगण्यात काय मतलब -
तो साहब, जिंदादिल लोगोके लिए पेश है -
कांच के गिलास'
हम कोई कांच के गिलास थोडेही है
कि हाथ से गिरे
और एकदम टूट जाये ।
आखिर हम दोस्त है, मेरे यार ।
पहले हम एक-दूसरे की
नजरोंसे गिरेंगे
और फिर आहिस्ता-आहिस्ता टूट जायेंगे ।
मुझे मालूम है -
ऐसे टूटनेमें तकलीफ तो होगी
पर हम कोई कांच के गिलास थोडेही है
कि हाथसे गिरे और एकदम टूट जाये ।
तुमभी जानते हो
और मै भी
कि कितना मुश्किल होता है
बंद दरवाजे की ओर बार-बार जाना
आती-जाती सांस के रास्ते में दिवार खडी करना
और चौराहेपर खडे रहना
किसी एक की प्रतीक्षा में
हम ऐसा नही करेंगे
हम ऐसा करेंगे
तुम कही और चले जाओगे
मै तुम्हे पत्र लिखुंगा
यहाँपर वुᆬशलपूर्वक हूँ
और आपकी वुᆬशलता श्री भगवानजीसे
शुभ चाहता हूँ ।
पत्र के उत्तर में तनिक देरी के लिए
तुम मुझसे माफी मांगोगे ।
फिर मै तुम्हारी शादी की सालगिरह पर
कोई छोटा-मोटा गिपत्ट भेजुंगा ।
और तुम
पिताजी के अचानक गुजर जानेके गम मे
मुझसे हमदर्दी जतलाओगे ।
फिर मै तुम्हे ईद-मुबारक कहूँगा
और तुम मुझे दिवाली की
शुभकामनाए भेजोगे ।
ऐसे आहिस्ता-आहिस्ता
३१ दिसंबर की वह ठंडी शाम आयेगी
जब हमारे ग्रिटींग कार्डस्
किसी डाकघरमें अचानक टकरा जायेंगे
और टूट जायेंगे ।
मुझे मालूम है,
ऐसे टूटनेमें तकलीफ तो होगी
पर हम कोई कांच के ग्िालास थोडेही है
कि हाथसे गिरे और एकदम टूट जायें ।
आखिर हम दोस्त है
मेरें यार !
आमतोज
- फुलचंद्र मानव
साधारणतः १९७३-७४ च्या काळात प्रसिद्ध झालेली ही कविता असावी़ बहुतेक धर्मयुग' मध्ये़ मूळात ती पंजाबी भाषेतली असावी़ कवि आभतोज आणि अनुवादकर्ता पुᆬलचंद्र मानव़ एवढा संदर्भ त्या नोंदीबद्दल लागू शकतो़
कविता पंजाबीतली असली काय आणि ती हिंदीत अनुवादीत झाली काय अन् मराठी माणसाने ती अनुभवली काय या स्थलांतरामध्ये तिच झोंबण' काही तीळमात्र कमी होत नाही़ उलट ते आधक वैश्विक होत जातं़ आणि ह्या सार्याच्या पल्याड कविता केवळ मानवी होत जाते़
एखादा शेर आपल्याला आवडतो एखादं गाणं आपल्याला आवडतं एखादी कविता आपल्याला आवडते़ बर्याचदा तिचा कवी कोण? हे आपल्याला माहीतही नसते आणि माहीत झालं काय नि न झालं काय, तिच्या झोंबण्या' त काही फरक पडत नाही़ ते झोंबणंच तेवढं आपलं' असतं आणि आपल्यापुरतं ते पुरेसं असत.
काचेच्या गिलासाची' ही प्रतिमा तशी किती साधी़ दैनंदिन जीवनातली नेहमीच्या परिचयाची़ पण ती जेव्हा कवितेत येते अन् मैत्रीतल्या तुटण्या' सोबत कवी जेव्हा तिची गाठ मारतो, तेव्हा ती चटकन मनाची पकड घेते़ तुकारामाच्या कवितेत अशा अनेक प्रतिमा दैनंदिन जीवनातल्या येतात़ चटकन मनाची पकड घेतात़ कारण त्या रोज आपण पाहिलेल्या असतात़ त्यांना आपण रोज भेटलेलो असतो़ मानवी जीवनाचा त्या जणू एखादा अवयवच असल्यासारखा असतात़ हे त्यांचं जे स-इंद्रियत्व आहे ना, तेच आपल्याला वुᆬठेतरी पार्थीव वाटतं-मानवी वाटतं सजीव वाटतं़ आणि मग बरेचदा समीक्षेत येणारा सेंद्रीयत्व' हा शब्दही आपल्याला नुसताच कळू लागत नाही तर तो आकळूही लागतो़
काचेच्या गिलासा'तही काच ही आपल्याकडे एका छान प्रतिमेच्या रूपाने येते़ स्रीच्या कौमार्याला- शीलाला काचेच्या भांड्याची' उपमा आपल्या ग्रामीण भागात देतात़ पाह्यजो माय' ते' काचाचं भांडं असते बरं, एकदा पुᆬटलं का पुᆬटलं !, काचेचा शोध लागल्यापासून आजपर्यंत ही प्रतिमा लोकभाषेत कायमची रूढ होऊन बसली आहे़ म्हणजे ती मानवी जीवनातली एक सनातन प्रतिमा आहे़ ह्या प्रतिमेला आणखी वेगळा अर्थ-वेगळी छटा-वेगळा आयाम वेगळी आभव्यक्तीक्षमता कवीने कांच के गिलास' मध्ये दिलेली आहे काव्यातील नाविन्य जे मर्ढेकरांना अपेक्षित आहे ते तरी दुसरे काय आहे? मर्ढेकरांनी ते बीजगणिताच्या भाषेत मांडले़ अ=ब ही रूढ भावनानिष्ठ समतानता असेल तर अ=क हे मांडणे म्हणजे नक्की भावनानिष्ठ समतानता प्रस्थापित करणे़ म्हणजेच काव्यातील होय, असे मर्ढेकरांचे थोडक्यात म्हणणे़
(अ) (ब) आणि (क) ही तीन पदं बीजगणिताच्या भाषेत आपण मांडलीद तर
अ= काचेचं भाडं
अ = काच के गिलास
ब = कौमार्य, शील
क = मैत्री
(अ) काचेचे भांडे = कौमार्य, शील (ब)
(अ) कांच के गिलास = मैत्री (क)
अशी ती मांडणी होईल़ अर्थात, काव्य म्हणजे अशाप्रकारचे बीजगणित खचितच नाही़ केवळ मांडणी सुस्पष्ट व्हावी एवढ्यासाठीच आपल्याला बीजगणिताचा आधार घ्यावा लागतो एवढंच़ बीजगणितातला' गणित हा शब्द वेगळा केला तर बिज हा शब्द मात्र आपल्याला काव्यातील नाविन्याच्या मूळा' पाशी घेऊन जाईल़ मग तेथे बीज' आणि गणित' हे साधे शब्दही प्रतिमांचे रूप घेऊन अवतरतील आणि बीजगणित' या संयुक्त शब्दाला केवळ असा अर्थ न राहता त्याला बीजमंत्रा' सारखी मंत्रशक्ती' आणि बीजाक्षरा' सारख अक्षरत्व' येत जाईल़ आणि ती एक संयुक्त प्रतिमा होईल़ आलं का हे गणित्ा ध्यानात? असा प्रश्न विचारला की गणित हा शब्दही आपले षचारीसचौबचन रूप बदलून ज्ञानेश्वरांनी मांडलेल्या प्रमेयाचं रूप धारण करतो आणि पुन्हा एकदा शब्दाआधी' झोंबतो' अर्थात ह्यापुढे शब्दांना जास्त पिंजू नये़
माणूस समझदार'असला तर त्याला इशारा' ही काफी' असतो़ नाही काय?
और एकदम टूट जाये'
आणि आहस्ता-आहस्ता टूट जायेंगे'
टूटना (तुटने) हे व्रिᆬयापद एकदा कांच के गिलास' ला आणि दुसर्यांदा हम' साठी लाऊन पुन्हा एकदा कवीने नवीन भावनानिष्ठ समतानताच प्रस्थापित केली आहे़
यासोबत टूट जाये' या व्रिᆬयापदाला पहिल्यांदा लावलेलं एकदम' हे काचेच्या संदर्भातील क्रियाविशेषण आणि दुसर्यांदा आहिस्ता-आहिस्ता हे मैत्रीच्या संदर्भातील क्रियाविशेषण विरोधी अर्थाने एक प्रकारचा ताण, एक प्रकारचा पीळ त्या ‘टूटण्याला’ देते आणि रूपक क्रियेने ‘टूटने' हे क्रियापद प्रतिमेच्या पातळीवर जाते़
कि कितना मुश्किल होता है
बंद दरवाजे की ओर बार-बार जाना
आती-जाती सांस के रास्ते में दिवार खडी करना
और चौराह पर खडे रहना
किसी एक की प्रतीक्षामें
ह्या तिन्ही प्रतिमातून व्यक्त होणारा निखळ मैत्रभाव एक दूसरे' की नजर से गिरेंगे और फिर आहिस्ता-आहिस्ता टूट जायेंगे या ओळीच्या संदर्भात लक्षात घेतला की, मैत्र' जिवाचे ह्या पसायदानातल्या शब्दांचाही एक वेगळाच अर्थ आपल्या समोर उलगडू लागतो आणि त्यातही
आती-जाती सांससें दिवार खडी करना' ही प्रतिमा तर असे जगणं-मरणं एका सासाचं अंतर' असं सास-दिवार खडी करना जगणं मैत्री जिवाचे' अशा बहिणाबाई आणि ज्ञानदेवांच्या शब्दांनाही आपल्या कवेत सामावून घेत़ आणि मैत्रभावाचे कितीतरी वेगवेगळे तरंग मनात उमटवीत राहते़
मित्राची वुᆬठली तरी एखादी गोष्ट मनाला लागून जाते कदाचित त्यानं आपल्या म्हणण्याप्रमाणे ऐकलेलं नसतं कदाचित त्याचा लोभी' स्वभाव आपल्याला नडतो़ कदाचित आर्थिक व्यवहारांची गुंतागुंत होते़ कदाचित काही क्षुल्लक कारणानं गैरसमज होतात़ कदाचित एखादं नाजुक कारण असतं. कदाचित पोटा-पाण्यासाठी वाटा वेगळ्या होतात़ असं काही बाही होत जातं आणि-
हम एक दूसरे की नजरोसे गिरेंगे
और फिर आहिस्ता आहिस्ता-
मग उरतो तो केवळ पत्रलेखनातला कोरडा उपचार त्यातला खोटेपणा त्यातली कृत्रिम, आपकी वुᆬशलता श्री भगवाजीसे शुभ चाहता हूँ' शादी की सालगिरह पर कोई छोटा मोठा गिप्ट' पिताजी के अचानक गुजर जानेके गममें हमदर्दी'
ईद मुबारक' आणि
दिवाली की शुभकामनाए'
खरं तर ईद' आणि दिवाळी' ला एकत्र आणून कवीने आणखी एक वेगळाच पीळ' कवितेला दिला आहे़
त्यानंतर पुन्हा
ऐसे आहिस्ता-आहिस्ता
३१ दिसंबर की वह ठंडी शाम आयेगी
ह्या ओळीतील आहिस्ता-आहिस्ता' हे व्रिᆬयाविशेषण लक्षात घेतलं तर आहिस्ता-आहिस्ता टूट जायेंगे' ला ते किती प्रभावी करतं हे लक्षात येतं़
शाम' लावलेलं' ठंडी' हे विशेषण तर अगदी जीवघेणं आहे हा उपचारातला ठंडपणा' म्हणजे एकप्रकारे मैत्रीचं मरणं' ते सुचवतं आणि म्हणूनच ते विशेषण मनाला सणाण झोंबत़ पुढे तर कहरच आहे़
जब हमारे ग्रिटींग कार्डस्
किसी डाक घर मे अचानक टकरा जाऐंगे
और टूट जायेंगे
या ओळीत टकरा जायेंगे'-टूट जायेंगे याच्यामध्ये जे और' येतं तेही मोठं खतरनाक आहे़ आणि त्यामुळेच मग
एसे टूटनेमें तकलीफ तो होगी
पर हम कोई कांच के गिलास थोडेही है
कि हाथसे गिरे और एकदम टूट जाये
आखिर हम दोस्त है
मेरे यार
धृपदासारख्या येणार्या ह्या ओळी कवितेतल्या तकलीफ' देणार्या मैत्रभावाचं आवर्तन पूर्ण करतात़ त्यातही आखरी' हा शब्द पुन्हा एकदा अखेरचा आणि आरपार जाणार आहे़
आणि शब्दाआधी झोबिंजे प्रमेयासी म्हणजे नेमकं काय? हे अनुभवत आपण डायरी मिटतो खरी पण कवितेला मनातून काही मिटवू शकत नाही अन् जग वरवर कितीही बदललं तरी गिलासाच्या टूटलेल्या काचाचं मनात खोलखेल रूतणं काही थांबवू शकत नाही़
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा