कवितेपेक्षा गझलेत 'मी ' अधिक आढळतो कारण गझलेचा स्वर संवादी असतो. संवादात 'मी- माझे, तू- तुझे, आम्ही -आमचे , तुम्ही -तुमचे, ते - त्यांचे ' अपरिहार्य असते. गझलेतला 'मी ' हा निवेदक असतो. तो एकाचवेळी आत्मनिष्ठ आणि समष्टीचा प्रवक्ता असतो. त्यामुळे गझलेत गझलकाराचे आत्मचरित्र शोधणाऱ्याला सत्य गवसत नसते. खरं तर असा शोध घेणं हा व्यक्तीचा आणि अभिव्यक्तीचा उपमर्द असतो, ह्याचं भान सभ्य वाचनसंस्कृतीला निश्चितच असतं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा