पाप-पुण्य


पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा ।
आणिक नाही जोडा दुजा यासी ॥

मित्रांनो, 
आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, पुण्य-पुण्य ज्याला म्हणतात ते असते तरी काय ? आणि पाप-पाप ज्याला म्हणतात ते असते तरी काय ? 
अमुक केलं तर पुण्य होईल का? टमुक केलं तर पाप होईल का ? आणि मग हळुहळू एक यादीच तयार होते की अमुक-अमुक म्हणजे पुण्य आणि टमुक-टमुक म्हणजे पाप़
पाप पुण्याच्या या यादीला अती संक्षिप्त करून तुकाराम महाराजांनी अभंगाच्या एका चरणात सामावून घेतलं आहे़ घागर मे सागर आपण म्हणतो ना, तसा पाप पुण्याच्या लांबलचक यादीचा अर्क काढून आपल्या समोर मांडला आणि एखाद्या मंत्राइतकी छोटीशी सरळ-सोपी अशी एक अजोड व्याख्याच केली आहे -
पुण्य पर उपकार ।
पाप ते पर पीडा ॥'
परोपकार हा शब्द आपल्याला माहीत आहे़ पण त्या एका शब्दात दोन घटक आहेत पर आणि उपकार पर म्हणजे परका़ दुसरा़ त्या दुसर्‍यावर केलेले उपकार-परक्यावर केलेले उपकार म्हणजे परोपकाऱ
आपल्या जो नात्यागोत्याचा नाही़ जातीपातीचा नाही़ ज्याचा धर्म कोणता हे आपल्याला ठाऊक नाही़  अशा अनोळखी माणसावर केलेले उपकाऱ आणि असे उपकार आपल्या हातून घडले-ते पुण्य़
तसेच अशा अनोळखी माणसाला आपल्याकडून त्रास झाला़  पीडा झाली़  तो दुखावला गेला - तर ते पाप़
एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर आज आपण उभे आहोत़  विज्ञानाने आदि भौतिक सुखाचे एक विराट असे दालन आपल्या समोर खुले केले आहे़  त्यामुळेच आपण आज आधक सुखलोलूप झालो आहोत़ भोगासक्त झालो आहोत़
सगळी सुखं, सगळे भोग हे माक्यासाठी आणि केवळ माक्यासाठीच असावेत; असे प्रत्येकाला वाटू लागले आहे़ व्यक्तिमत्त्व विकास, करिअर अशा शब्दांनी तर एवढा कहर केला आहे की आपल्या सख्ख्या भावाचाही विचार आपल्यापुढे गौण ठरतो आहे़ तेथे अनोळखी माणसांवर उपकार करण्याची बात दूरच़
कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केलेले कार्य म्हणजे उपकाऱ
अमुक गोष्ट केली तर त्याचा फायदा काय ? असे प्रश्न प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर आता सर्रास विचारले जातात़ आणि फायदा होत नसेल तर ती करायची कशाला ? कशाला आपला वेळ आणि श्रम वाया घालवायचे ? अशी वृत्ती बळावत चालली आहे़ या अर्थाने आपण टोकाचे मतलबी होत चाललो आहोत़
पैशात मोजता येणार नाही अशा आनंदासाठी आपण कार्य करणं जवळपास बंदच केलं आहे़
एकप्रकारे आपल्या जगण्यातला आनंदाचा झरा आपण मतलबाच्या अपेक्षेने गढूळ करुन टाकला आहे़ आपला दैनंदिन व्यवहार जणू काही उपकाराची भाषा विसरून गेला आहे़
दुसर्‍याचा विचारच आपल्या मनात येत नाही़  सतत मी-मी आणि माझं-माझं असं आपण करु लागलो आहोत़  आणि त्यामुळेच दुसर्‍यावर अन्याय होतो आहे़ दुसर्‍याचे शोषण होते आहे़  तो पीडीत होतो आहे़  हे आपल्या आत्मकेंद्री वृत्तीला कळतही नाही़  म्हणजेच तुकारामाच्या भाषेत आपण पापाचे भागीदार होत चाललो आहोत तेव्हा साध्या धन्यवादाचीही अपेक्षा न ठेवता दुसर्‍यासाठी आपण एखादे कार्य करु या आणि पुण्य जोडूया़

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा