पुस्तक परिचय : जनसंपर्क


शासन असो की संस्था, कार्पोरेट असो की एऩ जी़ ओ़ या सर्वांनाच जनमानसात आपली स्वच्छ प्रतिमा निर्माण करावी लागते़ निर्माण झालेल्या प्रतिमेचा दर्जा सातत्याने उंचावत राहिला पाहिजे याची दक्षता घ्यावी लागते़ लोकांच्या मनोपटलावर उमटलेली प्रतिमा जपणे, तिला धक्का लागू न देणे, तसा प्रयत्न करणार्‍या स्पर्धकांना प्रसार-प्रचाराच्या माध्यमातून चोख उत्तर देणे ह्या सर्व घटकांचा समावेश प्रतिमा व्यवस्थापनात होतो़
इमेज बिल्डिंग आणि इमेज मॅनेजमेंट ह्या यशाच्या शिखराकडे नेणार्‍या दोन पायर्‍या आहेत़ ह्या  पायर्‍या बांधण्यासाठी जे कॉंक्रीट लागते ते म्हणजे दांडगा जनसंपर्क होय़ संदेश वहनाचे शरीर सुदृढ ठेवणारी अत्यंत महत्वाची रक्तवाहिनी म्हणजे पब्लिक रिलेशऩ याचे सजग भान ठेवून शासनाला आपले स्वतंत्र असे माहिती आणि जनसंपर्क संचालनालय निर्माण करावे लागते़ विविध संस्था, विद्यापीठे, कंपन्या यांना जनसंपर्क आधकार्‍यांचे स्वतंत्र पद निर्माण करावे लागते़
जिल्ह्याच्या ठिकाणाहून प्रकाशित होणार्‍या साध्या लंगोटी साप्ताहिकापासून तर मल्टीनॅशनल टीव्ही चॅनेल्सपर्यंत डिजिटल होउᆬ लागलेले प्रसिध्दी माध्यम, व्यापक जनसंपर्काने आता वैश्विक झालेले आहे़ आमदार-खासदार-शिक्षण सम्राटांचे वाढदिवस असो की, सेलफोन निर्मीतीत नावाजलेल्या कंपनीच्या हॅंडसेटमधील बॅटरीचा स्फोट होणे असो या निमित्ताने जाहिरात मोहिम- ऍड कॅम्पेन राबवून प्रतिमा व्यवस्थापनाचे तंत्र अमलात आणले जाते़ त्यामुळे जनसंपर्क हा हल्लीच्या कार्पोरेट लाईफचा श्र्वास आहे़ असे म्हटले तर आतशयोक्ती होणार नाही़
जनसंपर्क म्हणजे नेमके काय? जनसंपर्क शास्त्राचा उदय आणि विकास कसा झाला? सार्वजनिक व शासकीय संस्थेत जनसंपर्काची भूमिका कोणती? जनसंपर्काचे व्यवसायिक स्वरुप कसे असते? या सर्व प्रश्नांची मुद््‌देसुद उकल करणारे एक अत्यंत उपयुक्त असे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले़ शीर्षक आहे जनसंपर्क आणि लेखक आहेत डॉ़ संजय कप्तान आणि डॉ़ किशोर फुले़
डॉ़ संजय कप्तान हे सध्या पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शास्त्र व संशोधन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत़ तीस वर्षाचा वाणिज्य व व्यवस्थापनाच्या अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या खात्यात जमा आहे़ वाणिज्य व व्यवस्थापन, जाहिरात, उद्योजक अशा अभ्यासक्षेत्रांचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे़ ह्या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिलीत़ लोकमान्यतेसोबतच राज्य पुरस्काराने त्यांना राजमान्यताही प्रदान केली आहेत़
डॉ़ किशोर फुले अमरावतीच्या श्री शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे आधव्याख्याता आहेत़ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क आधकारी म्हणून त्यांनी पंधरा वर्षे यशस्वीपणे कार्य केले आहे़ त्यांच्याकरिता जनसंपर्क हा केवळ दैनंदिन औपचारिक कार्याचा भाग कधीच नव्हता, किंबहुना तो त्यांच्या आंतरिक जिव्हाळ्‌्याचा आणि मनस्वी आवडीचा विषय असल्याने त्यांनी जनसंपर्क या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे़ लेखक, संपादक आणि प्रभावी वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे़
जनसंपर्क हा विषय मुद््‌देसूदपणे आणि आटोपशीरपणे या पुस्तकात मांडला आहे़ या पुस्तकात एकुण दहा प्रकरणे आहेत़ पहिल्या प्रकरणात जनसंपर्क ही संकल्पना विशद करताना प्रस्तावनेच्या प्रारंभी अब्राहम लिंकन यांचा सुंदर दाखला दिला आहे़ पब्लीक सेंटिमेंट इज एव्हरीथिंग विद पब्लीक सेंटिमेंट, नथिंग कॅन फेल, विदाउᆬट इट नथिंग विल सक्सीड़ जनसंपर्काशी संबंधित महत्वाच्या संज्ञा, जनसंपर्काशी स्ांबंधित विविध शास्त्रांचे योगदान जनसंपर्काची कार्ये या प्रकरणात सांगितली आहेत़
दुसर्‍या प्रकरणात जनसंपर्कशास्त्राचा उदय आणि विकास कालानुक्रमे मांडलेला आहे़ इ़ स़ १९०० ते २००२ या शंभर वर्षाच्या कालखंडातील पहिले महायुध्द, महामंदी, दुसरे महायुध्द, आणि माहिती युग असे ऐतिहासिक महत्वाचे टप्पे पाडून प्रत्येक टप्प्यावर जनसंपर्क शास्त्र कसे विकसित होत गेली याची सुरेख मांडणी केली आहे़ रेक्स हार्ली, थिओडॉर, रुझेवल्ट, एडवर्ड बर्नेज, पॉल गॅरेट, आयव्हीली, कार्ल बोईर जॉन डब्ल्यू़ हिल, आर्थर पेज अशा जनसंपर्क शास्त्राच्या जनकांची छायाचित्रे आणि योगदान ह्या  प्रकरणात दिलेले आहेत़
तिसर्‍या प्रकरणात भारतातील जनसंपर्काचा शोध लेखकांनी उत्तमपणे घेतला आहे़ महाभारत, कबीराचे दोहे, ज्ञानदेवांची ज्ञानेश्र्वरी, तुकोबांची गाथा, समर्थांचा दासबोध छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र या ग्रंथातून जनसंग्रह आणि जनसंपर्क विषयक अनेक दाखले दिलेले आहेत़ त्यातील उल्लेखनीय श्लोक, ओव्या या प्रकरणात उद्धृत केलेल्या आहेत़ त्यातील समर्थांचा एक श्लोक तर जनसंपर्काचे व्यवस्थापनसूत्र सांगणारा आहे़
आधकार पाहोन कार्य सांगणे । साक्षेप पाहोन विश्र्वास धरणे
लोकराजी राखोन कीजे । सकळ काही ॥
चौथ्या प्रकरणाला माहिती युगातील जनसंपर्काची ओळख करुन देताना प्रसार माध्यमे, व्यक्तिस्वातंत्र्य, १९५० ते ८० च्या दशकातील तांत्रिक बदल, जनमताचा वाढता प्रभाव, संदेश वहनातून निर्माण होणार्‍या समस्या अशा मुद्यांना लोकांनी प्रतिपादित केले आहे़
पाचव्या प्रकरणात जनसंपर्काचे सामाजिक व संघटनात्मक महत्व शब्दांकित केले आहे़ जनसंपर्काचे स्वरुप, जनसंपर्काचे संघटनात्मक महत्व, उत्कृष्ट जनसंपर्क व्यवस्थापकाची वैशिष्ट््ये, जनसंपर्क विभागाचे संघटनेतील स्थान अशा घटकांवर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे़
सहाव्या प्रकरणात सार्वजनिक व शासकीय संस्थातील जनसंपर्काची भूमिका स्पष्ट केली आहे़ लाभहेतुने आणि लाभ हेतुशिवाय कार्य करणार्‍या शासकीय, खाजगी आणि सार्वजनिक संस्थांची क्षेत्रनिहाय विभागणी करुन विशिष्ट क्षेत्रातील जनसंपर्काकरिता जाहिरातींची सचित्र उदाहरणे मॉडेल म्हणून या प्रकरणात समाविष्ट केली आहेत़
सातव्या प्रकरणात जनसंपर्काची प्रक्रिया सैध्दांतिक पध्दतीने उलगडून दाखविली आहे़ त्याकरिता रेखीव आकृत्यांचा उपयोग केलेला आहे़ जनसंपर्क आधकारी आणि प्रसार माध्यमे यांच्यातील संबंध संगीत कलेतील नृत्यदिग्दर्शक व नर्तक यांच्यासारखे असतात़ दिग्दर्शन चुकले, तर पदन्यास चुकतोच म्हणून संपूर्ण सौहार्दता हाच माध्यम संपर्काचा खरा आधार आहे़ अशी सुंदर टीप द्यायलाही लेखक विसरले नाहीत़
आठव्या प्रकरणात जनसंपर्काचे व्यावसायिक स्वरुप दर्शविले आहे़ जनसंपर्क कार्याची लिखित आणि आचारसंहिता या प्रकरणात सविस्तरपणे अधोरेखीत केली आहे़
नवव्या प्रकरणात कंपनी व्यवसायात संदेश वहनाची भूमिका तिच्या विविध अंगांनी साकारली आहे़ तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत आलेल्या विकासाच्या लाटा, एकविसाव्या शतकातील व्यावसायिक नेतृत्व, कार्पोरेट संस्कृती, संगणकीकरण, वैश्विकीकरण या तिपाईवर उभा असलेला नव्या शतकाच्या विकास साधताना संदेश वहनाचे अनन्यसाधारण महत्व येथे सांगितले आहे़
दहाव्या आणि शेवटच्या प्रकरणात कंपनी व्यवसायात जनसंपर्काची चर्चा केली आहे़ प्रतिमा, निर्मिती, प्रसिध्दी, प्रतिष्ठा, प्रतिमा संवर्धन या करिता जनसंपर्काची आवश्यकता येथे मुद््‌देसूदपणे प्रतिपादित केली आहे़ त्याकरीता जाहिरातींचे नमुने दिलेले आहेत़
एकंदरीत जनसंपर्काचे रेडीरेकनर म्हणता येईल असे हे उपयुक्त पुस्तक मराठीत उपलब्ध करुन दिल्याबद््‌दल लेखक द्वय धन्यवादाचे हकदार आहेत़ क्षेत्र कोणतेही असो जनसंपर्काकरिता हे पुस्तक मार्गदर्शनाकरिता वारंवार वाचावे, जवळ बाळगावे असेच आहे़
शाम भालेकरांचे समर्पक मुखपृष्ठ, मुकुंद संगोराम यांची प्रस्तावना, आणि शेवटी दिलेल्या पारिभाषिक शब्द संग्रह व संदर्भ ग्रंथसूची यांनी प्रस्तुत ग्रंथ परिपूर्ण झाला आहे़

जनसंपर्क
डॉ़ संजय कप्तान, डॉ़ किशोर फुले
डायमंड पब्लिकेशन, पुणे ३०
प्रथम आवृत्ती १५ ऑगस्ट २००९
मूल्य : १४० रुपये

1 टिप्पणी: