भाषा नष्ट होत चालली की संस्कृती वाचत नाही

अध्यक्षीय भाषण



(संपूर्ण महाराष्ट्रात नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ म्हणून अग्रेसर असलेल्या अंवुᆬर साहित्य संघाचे २६ वे राज्यस्तरीय अंवुᆬर मराठी साहित्य संमेलन अकोला जिल्ह्यातील वुंᆬभारी येथे २४ जून २००० रोजी सुप्रसिद्ध कवी प्रा़ श्रीकृष्ण राऊत यांचे अध्यक्षतेखाली भव्य प्रमाणावर साजरे होत आहे़  त्यांचे अध्यक्षीय भाषण आम्ही येथे देत आहोत़)

सवीसाव्या अंवुᆬर साहित्य संमेलनाचे माननीय उद्घाटक, प्रमुख आतथी आणि साहित्यप्रेमी मित्रांनो,
संमेलनाच्या गर्दीपासून मी तसा चार हात दूर राहणार आणि त्यामुळेच फारसा प्रसिद्धीच्या झोतात नसणारा असा एक छोटासा कवी आहे़
अशा माणसाला अध्यक्षपदाचा बहुमान देऊन अंवुᆬर साहित्य परिवाराने, जय बजरंग व्यायाम शाळेने आणि उपस्थित आपणा सर्वांनी माक्या कवितेवरील आपले पे्रमच व्यक्त केले आहे़  त्याबद्दल मी आपला सर्वांचा अत्यंत ऋणी आहे़
वुंᆬभारीत हे संमेलन होत आहे याला मला मनापासून आनंद झाला आहे़  वुंᆬभारीचा आणि माझा ऋणानुबंध हा आजकालचा नाही़  चांगला जुना आहे़ दिवस किती भराभर निघून जातात़  हां हां म्हणता तीस वर्षे झाली़  बरोबर वीस वर्षापूर्वी डॅडी देशमुख आणि विठ्ठल वाघांसोबत मी इथे पहिल्यांदा आलो होतो तो राघू मैना' या चित्रपटाचा तरुण गीतकार म्हणूऩ  तेव्हा मी नुकताच कविता लिहू लागलो होतो़
इथेच मी पाहिलेत कॅमेर्‍या मागचे कडक शिस्तीचे सिने दिग्दर्शक राजदत्त, नृत्यातल्या विविध मुद्रांनी माक्या गाण्याचे शब्द जीवंत करणारे सुबल सरकार आता नाचते नाचते बिजली' या माक्या शब्दांवर अख्खी रात्र विजेसारखी थय थय नाचणारी मधु कांबीकऱ
इथेच नाना पाटेकरांना मी कविता ऐकवल्या आहेत आणि त्या काळच्या त्यांच्या नाटकातले संवादही त्यांच्या तोंडून ऐकले आहेत़  राघू मैना' चा हिरो' असलेल्या नाना पुन्हा या वुंᆬभारीत उगवला तो प्रहार' चा डायरेक्टर' म्हणूऩ प्रहार' च्या अखेरच्या दृश्यात उघडेनागडे धावणारे हज्जारो बाल कलाकार याच वुंᆬभारीचे आहेत़ 
अशी बडी बडी मंडळी जशी या गावी येऊन गेली; तशीच इथली त्याकाळची छोटी छोटी मंडळी आपले हुनर दाखवीत सारी दुनिया हिंडून आली़
जानराव आगळे, विजय पचारे, वुᆬ़ कमल गावंडे आणि वुᆬ़ बेबी अतकरे ही नावं या गावचे भूषण आहे़  इथल्या वेतावरच्या मल्लखांबाने आणि धनुर्विद्येने एक दोन नाहीत तर चांगले सात देश जिंकले आहेत़ फ्रान्स, इटली, इंग्लंड, जर्मनी, हॉलंड, रशिया, फिनलंड ही नावं या गावाला केवळ नकाशात पाहण्यापुरती राहिली नाहीत़ तर इथल्या व्रिᆬडा कर्तृत्वाने वुंᆬभारीचा झेंडा चांगला सातासमुद्रापलीकडे फडकावला आहे़
आणि या सर्वांमागे आहे आपल्या मेहनतीने रात्रंदिवस झटणारा एक सुमार अंगकाठीचा ध्येयवेडा दाढीवाला- माझा मित्र तुकाराम बिरकड़  आपल्या कर्तृत्वाने जो सर्वांच्या आदरास पात्र ठरला आणि आज तुमचा माझा भाऊ' झाला़  साहित्यासारखीच त्याची ही निर्मिती' आहे़
व्यायामाचं जसं साहित्य असतं तसचं साहित्याला मेहनतीचा आयाम लागतो हे मी याच वुंᆬभारीत शिकलो आहे़ एकेका दृश्यासाठी पंचवीस पंचवीस रिटेक' केल्याशिवाय ते जीवंत होत नाही़  मग त्यातील कलावंत कितीही तरबेज असोत हे मी इथेच पाहिले आहे़  आणि कवितेतल्या एकेका ओळीसाठी असे अनेक रिटेक' केल्याशिवाय तिला प्रत्ययाचा जीव पुᆬटणार नाही याची खूणगाठ मी इथेच मनाशी पक्की बांधली आहे़
वीस वर्षानंतर आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं असलेलं जग झपाट्याने बदलते आहे़  सगराचे नगरं होत च्ाालले आहेत़  भौतिक सुखसमृद्धीसाठी चढाओढ लागली आहे़ पद-प्रतिष्ठेसाठी जीवघेणी स्पर्धा आहे़  संगणक-इंटरनेटचा जमाना आला आहे़  बोललेला' आणि लिहिलेला' शब्द थोडा मागे पडून मॉनिटरवर शब्द दिसू' लागला आहे़  जेवणाच्या पंगतीतून श्लोक गायब होत चालले आहेत आणि मंगलाष्टकांचे गायन आपली परंपरागत हृदयस्पर्शी चाल सोडून शास्त्रीय होत चालले आहे़  येऊ घातलेल्या युगाची जागतिक भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून इंग्रजी सक्तीची झाली आहे़  ती आनंदाने शिकली पाहिजे़  पण भाषा जेव्हा संस्कृतीवर आव्रᆬमण करते, जीवनमूल्यांना संव्रᆬमित करते तेव्हा तिला रोखलेही पाहिजे कावूᆬ, मामी, मावशी, आत्या या वेगवेगळ्या नात्यांना केवळ आँटी' या शब्दाने संबोधणार्‍या भाषेला माझा विरोध आहे़  ग्रामीण संस्कृतीत चुलतीला लायनी माय' मोठी माय' म्हणून जे हाका मारणं होतं त्यातून मायेचा ओलावा पाझरत होता़ ती सर आँटी'  या शब्दला येणारी नाही़
म्हणता म्हनता होट होटालागी भिडे,
आत्या म्हनता म्हनता केवढं अंतर पडे'
इंग्रजी भाषेने आणि तिच्यासोबत येणार्‍या संस्कृतीने नात्यातल्या ममत्वात असं वुᆬठेतरी अंतर पडत चाललं आहे असं वाटतं़  चरितार्थाचं साधन मिळवून देण्यात मदत करते म्हणून पोटासाठी इंग्रजी जरुर शिकावी़  पण आपल्याला केवळ पोटच नाही तर त्यावर हृदयही आहे; हे भान हरपू देता का नये़  इंग्रजीने शिकविलेली औपचारिकता माय-लेकाच्या नात्यात माती कालवते़  एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला' ला मी दिलेला इशारा त्यामुळेच लक्षवेधी आहे़
या कॉन्व्हेंटी संस्कृतीत
आईचे दूध पिल्यावर
तिला तू 
थँक यू'
म्हणू नकोस़
शामच्या आईला' 
ते कदापिही आवडणार नाही़
पण चढाओढीच्या चढत्या व्रᆬमात माणूस पोटासाठी हृदयाला विसरला आहे आणि त्याचे जगणे केवळ बुद्धीने चालले आहे़
अलीकडच्या काळातल्या कोणत्याही भाषेतल्या मराठीतल्या सुद्धा कविता वाचल्या तरी त्यात असलेले विचार-काव्याचे प्रमाण आधक दिसून येते़  ते पाहिले की माणसं भावनांनी खरोखर बोथट होत चालली आहेत की काय अशी शंका यावी़  नात्यातल्या पे्रमापेक्षा नात्यांची उपयोगीताच माणसांना आधक महत्वाची वाटू लागली आहे़  वुᆬटूंबसंख्येचे विघटन आणि व्यक्तीचे आत्मकेंद्रीपण एकाच वेळी घडते़  लोकसंख्येची गर्दी सारखी वाढते आहे़  पण त्या गर्दीतला माणूस मात्र सारखा एकटा एकटा पडत चालला आहे़
आणि हेच आहे अ-भाव कवितेच्या जन्माचे मूऴ कवितेत विचार याचा पण तो भावगर्भ होऊऩ
भाषा आणि संस्कृती हे अद्वैत आहे़ भाषा नष्ट होत चालली की संस्कृती वाचत नाही़  हे जगभरच्या आदिवासींच्या नष्ट झालेल्या भाषांवरुन शिकण्यासारखं आहे़
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पन्नासाहून आधक वर्षे उलटली आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीलाही चाळीस वर्षे झालीत तरी आधुनिक ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान आपण  मराठीत आणू शकलो नाही; हे आपले दुर्दैव आहे़  आणि आता तर सर्व सामान्यांना सहज कळणार्‍या मराठीत ते आणूच नये असा काही मूठभर लोकांचा त्यामागे मतलब तर नाहीना अशी शंकाही येऊ लागली आहे़  आधुनिक ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचे माध्यम म्हणून इंग्रजी शिका़  जरुर शिका़ पण दिवाणखान्यात शिरलेल्या या आँटी' ला स्वयंपाक घरात घुसू देऊ नका; एवढंच मला म्हणायचं आहे़

मित्र हो,
मराठी साहित्याची परंपरा ही आठशे वर्षांहून आधक जुनी आहे़  ज्ञानेश्वरानंतर चारशे वर्षांनी तुकारामासारखा मोठा कवी मराठीला मिळाला़  आणि तुकारामानंतर आता आणखी चारशे वर्षे झालीत तरी तेवढा मोठा कवी मराठीत झाला नाही़
ााठशे वर्षांच्या ह्या परंपरेत पाच पंचवीस वर्षे आणि लिहिता आलेल्या चार दोन चांगल्या कविता आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करुन देतात़
पण यातूनही ज्ञानेश्वर माऊली आपल्या पाठीवर हात ठेवते, धीर देते, आणि म्हणते -
राजहंसाचे चालणे
जगी झालेया शहाणे
म्हणून काय कोणे
चालोचि नये ॥

ज्ञानेश्वर तुकारामा सारख्या राजहंसाचं चालणं आपल्या आखूड पायांना जमेल का? पण म्हणून आपण एकाच ठिकाणी बसून राहणार आहोत काय?
कबूल आहे की पल्ला फार मोठा आहे़  आणि जोखीमही काही लहानसहान नाही़  पण ती उचलली पाहिजे़  लहानमूल चालायला शिकतं तेव्हा केवढी मोठी जोखीम त्याच्या समोर असते़  तरी ते एकेक पाऊल धीरानं़ टाकतं़ पडतं़ रडतं, उठतं, चालतं़ आणि एक दिवस धावू लागतं़
पी़ टी़उषा या अनुभवातून जाऊनच ऑलिम्पिक मध्ये पोचते़  तेथे तिला काही मिनिटे आणि काही सेकंदच धावायचं असतं पण त्यासाठी तिला वर्षानुवर्षे धावण्याचा सरावा करावा लागतो़
नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला धावण्याच्या जागतिक शर्यतीचे नियम लावून चालत नाही तसेच नव्याने लिहू लागलेल्या कवी-लेखकांना दर्जेदार आणि आभजात साहित्यगुणांच्या कसोट्या लावून भागणारे नाही़  त्यांनी जे काय भलं बुरं लिहिलं असेल त्याचं कौतुक केलं पाहिजे़  त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे़  ते आवर्जून प्रसिद्ध केलं पाहिजे पुस्तकरुपानं रसिकासमोर मांडलं पाहिजे़  त्यांना छोट्या-मोठ्या पारितोषिकांनी सन्मानित केलं पाहिजे़  त्यांच्या अंवुᆬरण्याला' खतपाणी घातलं पाहिजे आणि त्यांच्या चुकाही त्यांच्या लक्षात आणून दिल्याच पाहिजेत़
हे काम जिद्दीनं, नेटान सातत्यानं आणि वुᆬशल संघटकतेनं करणारा शेकोकार हा फार हिम्मती' चा माणूस आहे़  आणि आपल्या नवर्‍याच्या कार्यात बरोबरीचा वाटा आनंदाने उचलणार्‍या त्यांच्या सौभाग्यवती ह्या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात आणि अंवुᆬरलेला' हा साहित्याचा वाफा सु रेख'करतात़
साहित्याच्या निर्मितीनंतर तिला जतन करण्यासाठी एवढं सगळं भक्कमपणे उभं असतांना निर्मितीबाबत आपली काहीच जबाबदारी नाही का? नवोदितांचा हुंकार' ला आपण सकस लेखनर पुरवतो का? नुसती जमीन काळी कसदार असून चालत नाही़  तिची नांगरणी, वखरणी, खतपाणी हे सगळं कामचुकारपणा न करता वेळोवेळी करावं लागतं आणि मुख्य म्हणजे उत्तम प्रतीचं शुद्धबीज' ही त्याला लागतं, तरच चांगल्या पिकावर आपल्याला हक्क सांगता येतो़
चांगल्या लेखनासाठी चांगलं वाचनंही तेवढंच आवश्यक असतं़  स्थानिक वर्तमानपत्रातल्या कविता-कथांच्या पलिकडे आपण गेलं पाहिजे़  पुस्तक विकत घेणे शक्य नसेल तर वाचनालये आपल्यासाठी खुली आहेत़  वाचक नाहीत म्हणून कवितांची पुस्तक वाचनालयात उपलब्ध नसतात़  अशा पुस्तकांची मागणी आहे की तुम्ही त्यांना विकत घ्या़  संग्रही ठेवा़ वारंवार वाचा़ अडलं तिथे विनासंकोच जाणकारांना विचारा़  समजून घ्या़ आणि लिहिता लिहिता वाढत रहा़
हे सर्व ज्याला जमतं त्याच्या साहित्याची गुणात्मक वाढ त्याच्या वयाच्या वाढीसोबतच होत असते़  एखादा किशोर बळी, एखादा दिनेश गावंडे हे सगळं करु बघतो म्हणूनच त्यांच्याविषयी आपल्याला फार मोठ्या अपेक्षा बाळगता येतात़   
एक गोष्ट नव्या कवींसाठी मला आवर्जून सांगावीशी वाटते़  अमरावतीला झालेल्या साहित्य अकादमीच्या चर्चासत्रातील आपल्या बीजभाषणात भालचंद्र नेमाडे म्हणाले की, आजकालच्या कवींना छंद शिकविण्याची वेळ आली आहे़' मुक्त छंदातल्या अलीकडच्या कवितांचे गद्यावतरण पाहिले की त्यांचे म्हणणे आधक पटू लागते़  मुक्तछंदाची अंगभूत लय आजकालच्या कवितांत आजबात जाणवत नाही़  अलीकडच्या कवितांचे गद्यावतरण आणि त्यांचा मुक्तछंदातील विसविशीतपणा पाहिला की मर्ढेकरांचा मुक्तछंदाला असणारा कडवा विरोध किती सार्थ होता, हे जाणवते़ मराठीतल्या मर्ढेकरांना आणि उर्दूतल्या गालिबला छंद-वृत्तांची बंधने तंग' वाटत होती़ पण म्हणून त्यांनी मुक्तछंद आणि आझाद गझलचा स्वीकार केला नाही़  या इतिहासापासून आपण काहीच शिकणार नाही काय? आभव्यक्तीतला पसरटपणा पाहिला की वाटतं मर्ढेकरांच्या पूर्वीचे छंदात निबंध लिहायचे आता ते मुक्तछंदात लिहितात एवढंच !
ओवी-अभंग-अष्टाक्षरी-षडाक्षरी सारख्या साध्या-साध्या देशी छंदाचीही ओळख नव्या कवींना असू नये, याचे मोठे आश्चर्य वाटते़  त्यांचे पोषणच अगदी अलीकडच्या कवितांवर होत आहे, हे त्यातून स्पष्ट जाणवते़  मुक्तछंदाला माझा विरोध नाही, पण  तो आशयाची मागणी आणि आभव्यक्तीची अपरिहार्यता यातून जन्माला आलेला, घट्ट वीणेची अंगभूत लय घेऊन येणारा आणि मितभाषी अवकाशाला काटेकोरपणे व्यापणारा, गोळीबंद असा मुक्तछंद हवा़  आजकाल असा मुक्तछंद अभावानेच दृष्टीस पडतो़
आधक लवचिकतेसाठी मुक्तछंदाचे नामकरण मुक्तशैली म्हणून केले, तरी त्यातून येणारी शिथिलता आणि कवी पाहत असलेली त्यांची सोय' मात्र काही केल्या लपत नाही़
आजकाल सर्व मानवी व्यवहारांचे वेगानं व्यापारीकरण होऊ  लागलेलं आहे़  साहित्य व्यवहार देखील त्यातून सुटलेला नाही़  साहित्याचं अर्थ' शास्र दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे़  कवितालेखनाला गंभीरपणे घेण्याचा टेंभा मिरवणारे अनेक कवीच कविता-रती' चे वर्गणीदार नसावेत,  ही गोष्ट लांच्छनास्पद आहे़  वुᆬठल्याही प्रकारचे सरकारी अनुदान नसताना आपल्या म्हातारपणीची पुंजी' केवळ मराठी कवितेवरील पे्रमापोटी लुटविणार्‍या पुरुषोत्तम पाटीलांशी आमचं काहीच देणं-घेणं नाही का ? एखादा कवी मेल्यावर त्याच्याशी असलेल्या शाईच्या नात्याचा' उमाळा ज्या हृदयात येतो, त्या हृदयापाशी असलेला खिसा एवढा संवेदनाशून्य असावा ही गोष्ट चीड आणणारी आहे़
मोठमोठ्या शब्दांतून मानवी करुणेच्या लंब्या-चवड्या बाता करणारे आम्ही प्रत्यक्ष जगण्या-वागण्यात कसे दुतोंडी आहोत, हेच आम्ही वारंवार सिद्ध केले आहे़  कवितारती' अनुष्टुभ', श्रीवाणी', शब्दवेध' नव्यांची अक्षरचळवळ' आणि नवोदितांचा हुंकार' अशी मासिकं जगवण्याची जबाबदारी आम्ही सरकारवर टावूᆬन मोकळे होणार असू तर साहित्यावरचे आमचे पे्रम दांभिकच म्हणावे लागेल़
भाषिक कलाकृतीचा रसिकांशी असलेला स्वर संवादी हवा़  जीवा-भावाचे देणे-घेणे त्यातून व्हावे़ मराठीने केला कानडी भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ।' असा विसंवादी आणि दुर्बोध मामला असला तर कशाचा रस? अन्‌ कशाचा आस्वाद?  
आभजन-बहुजन-ग्रामीण-दलित ही अभ्यासाच्या सोयीसाठी केलेली वर्गवारी आहे़  माणूस' हा सर्व साहित्याचा केंद्रबिंदू आहे़  पण प्रत्येक वादाने स्वतःची वैशिष्टये, स्वतःचे वेगळे साहित्यशास्र मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून एकमेकांशी सवत्यासुभ्याचे वागायचे ठरवलेले दिसते़
 मुळात उत्कृष्ट साहित्य हे अशा कप्पेबंद कक्षांच्या परिघात अडवूᆬन पडत नाही़  ते जगाच्या पाठीवरील आखल मानवजातीची सुख-दुःखे, श्रृंगार, विरह, भावना, विचार, विकार आभव्यक्त करु बघते़  आणि ह्याच अर्थाने ते वैश्विकही ठरते़  म्हणूनच तुकारामाचे अभंग रशियात अभ्यासले जातात आणि तेथील मानव समुहाच्या मनाला ते भिडतातही़  घाशीराम कोतवाल' भाषेच्या आणि संस्कृतीच्या मर्यादा ओलांडून जगभर आपला' वाटतो, तोही याच कारणाने़  जात, धर्म, पं्रात, भाषा, देश या सगळ्यांच्या पल्याड सनातन मानवी भावनांना, विकारांना, विचारांना उद्गार देते आणि माणसांविषयी निखळ कारुण्याने मनाचा गाभारा भारुन टाकते, ते खरे साहित्य़  जे काळाच्या कठोर समीक्षतेही आपले आस्तत्व केवळ टिकवूनच ठेवत नाही, तर उजळून टाकते आणि आपण फिरुन-फिरुन त्या साहित्यातल्या शब्दांपाशी येत राहतो, त्यांना वाट पुसत राहतो; ते उगीच नव्हे़
बोली श्रेष्ठ की प्रमाणभाषा? मुक्तछंद श्रेष्ठ की गझल ? कादंबरी श्रेष्ठ की कविता ? हे प्रश्नही या संदर्भात फारच निरर्थक वाटतात़ आपल्याला जे जमतं ते श्रेष्ठ असा मानवी विकारच त्यामागे कार्यरत असल्याचे; तटस्थपणे विचार केल्यास आपल्याला कळून येईल़
आभजन आणि बहुजनांनी आपापली उच्चासने सोडून आदान प्रदानाची भूमिका स्वीकारली नाही, तर प्रत्येकाची वाढ एकांगीच होत राहणार आहे, लोकधाटीने आणि शास्रधाटीने वर्णसंकराची भीती बाळगली तर त्यांचे वंश खुरटे होत जाण्याचीच शक्यता आधक आहे; असे प्रकर्षाने वाटल्यावाचून राहत नाही़  शास्रकाट्याच्या कसोटीने कसून बांधलेल्या गोष्टी जशा कालांतराने मृतप्राय होतात, तसेच प्रवाहाची तटबंदी नाकारणारे पाणी इतस्ततः पसरून वाया जाते़
लोकधाटीतली लवचिकता शास्रालाही सळसळते चैतन्य प्रदान करु शकते आणि शस्रधाटीची पचेल तेवढी नियमीतता स्वीकारली, तर लोकधाटीला रेखीव रुप प्राप्त होते़  मर्ढेकरांच्या काही कविता' हे त्याचे उत्तम उदाहरण होय़  ओवीसारख्या लोकछंदाला अक्षरांच्या संख्येने काटेकोरपणे नियत करणारी मर्ढेकरांची काही कविता' आपल्याला आधक भावते तेही त्यामुळेच़
पुढे-पुढे मात्र मर्ढेकरांवर शास्रधाटी हावी होते आणि ती पादावुᆬलकसारख्या मात्रावृत्ताचे बाह्यांग धारण करते, अंतरंगातील अनोख्या प्रतिमांच्या नाविन्याचा हव्यास धरते, लोकधाटीतील सुगमतेचा पदर सोडून देते आणि मग बरेचदा दुर्बोध होऊन बसते़
शेवटी ज्याला आपण नवता' म्हणतो, ती काही आभाळातून पडत नाही़  ती परंपरांची पाळंमूळं घेऊनच जन्माला आलेली असते,  हे कदापिही विसरुन चालावयाचे नाही़
आभजन-बहुजन, ग्रामीण-शहरी, ललित-दलित अशा फालतू वादात पडण्याचं आपल्याला काही कारण नाही़  पुण्यात राहणारे आनंद यादव झोंबी' लिहू शकतात, ते ग्रामीण जीवनानुभवाच्या समृद्ध शिदोरीवरच ! नामदेव कांबळेंची राघववेळ' आशयद्रव्याने जेवढी दलित आहे तेवढीच ती वाचनीयतेने लालित्यपूर्णही आहे़  मराठी कवितेचे मायबाप असलेले तुकाराम आणि बहिणाबाई बहुजन समाजात जन्माला आले म्हणून त्यांची कविता आभजात ठरत नाही, असे नाही़
ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणाशी ।
धरावे पोटाशी बंधूपरी ॥
ह्या महात्मा पुᆬलेंच्या ओळी ज्ञानेश्वरांच्या पसायदाना इतक्याच विश्वात्मक ठरतात़
शब्दांची ताकद मोठी आहे़  शब्दांचे सामर्थ्य विशाल आहे आणि शब्दांच्या कक्षा विराट आहेत़  त्यामुळेच तुकारामाला शब्द कधी रत्नासारखे वाटतात, तर कधी शस्रासारखे़ म्हणूनच अशा शब्दांची साधना करायला कबीर आपल्याला सांगतो-
 साधो शब्द साधना कीजै ।''
महात्मा पुᆬलेंनी असाच एक थोर शब्द मराठीला दिला- निर्मिक'़ निर्मिक' म्हणजे निर्माण करणारा़  तुम्हा-आम्हा-सर्वांना निर्माण करणारा़  पृथ्वीसारख्या अनेक ग्रहांना आणि चंद्र-तार्‍यांना निर्माण करणारा़  आपल्याला आतापर्यंत माहीत असलेल्या आणि माहीत नसलेल्या सर्व सूर्यमालांना आणि आकाशगंगांना निर्माण करणारा़
हिंदूंचा ईश्वर', मुस्लिमांचा अल्ला' ख्रिस्तांचा गॉड' जगातल्या तमाम आदिवासींचा गोमेज' या सर्वांना एकाच वेळी कवेत घेणारा आणि त्यांना पुरून दशांगुळे उरणारा असा शब्द आहे निर्मिक'़
आखल मानवजातीसाठी करुणेने ओथंबलेला तो शब्द आहे़  महात्मा पुᆬलेंच्या कृतीशील चिंतनाने तो शब्द मराठीला दिला़  सावित्रीबाईच्या कवितेत आणि महात्मा पुᆬलेंच्या साहित्यात निदान शंभर वेळा हा शब्द आला असेल़  पण आम्ही मराठी लोक एवढे संवुᆬचित वृत्तीचे आहोत की आम्ही आमच्या कोणत्याही शब्दकोषात तो समाविष्ट केला नाही़  मग तो सुमारे ऐंशी हजार शब्दांचा महात्मा पुᆬल्यांच्या पुण्यातूनच प्रकाशित झालेला आदर्श (?) मराठी शब्दकोष' का असे ना !
गेल्या शंभर वर्षात महात्मा पुᆬलेंच्या एका शब्दाला ज्यांनी मान्यता दिली नाही, त्या आदर्शां'  कडून आधुनिक मराठी कवितेचे जनकत्व पुᆬले दाम्पत्याला मिळण्याची अपेक्षा व्यर्थ आहे़
ज्यांनी आधुनिकता महाराष्ट्राच्या देशी परंपरेची पाळेमुळे नाकारते आणि अमरवेलीसारखी इंग्रजीतून आयात केलेल्या वाङ्मयीन निकषांवर पोसली जाते आणि आशयनिष्ठ मानवी करुणेच्या महान जीवनमूल्याला डावलते; तेव्हा त्यांच्या आधुनिकतेच्या संकल्पना आपल्याला मूळातूनच तपासून पाहिल्या पाहिजेत़
इथे मला सांगायला आनंद होतो की तशी सुरुवात झाली आहे़  एखादा आवनाश सप्रे, एखादा किशोर सानप, एखादा भगवान ठग आधुनिक कवितेची मांडणी पुᆬल्यांपासून करतो आहे़
आता आपल्यावर जबाबदारी एकच आहे की आपण या एकट्या दुकट्या हाकेला ओ' दिली पाहिजे़  त्यांचा आवाज भक्कम केला पाहिजे आणि-
बांधून टाकलेली आहे जरी हवा ही
उच्चार वादळाचा तो थांबणार नाही़
जिव्हा विवूᆬन तोंडे बसली जरी मुक्याने
दौतीत कोणत्याही नाही गहाण शाई !'
हे दाखवून दिले पाहिजे़
काळाच्या ओघात सत्य जेव्हा-जेव्हा झाकोळून गेले, तेव्हा-तेव्हा हताश झालेल्या माणसाला शब्दानेच धीर दिला आहे़  निराश झालेल्यांना दिलासा दिला आहे़  मेलेल्या मनात पुन्हा प्राण पुंᆬकला आहे आणि त्याला पुन्हा संघर्षासाठी प्रवृत्त केले आहे़
मग तो शब्द भगवान गौतम बुद्धाचा असो की ओशोंचा, ज्ञानेश्वरांचा असो की तुकारामाचा, कबीराचा असो की बहिणाबाईचा, महात्मा पुᆬलेंचा असो की आंबेडकरांचा, रसाळ नामदेवाचा असो की ढसाळ नामदेवाचा, आणि दुष्यंतवुᆬमारचा असो की धूमिलचा़
त्या शब्दातून तुमच्या माक्यासाठी अखंड पाझरत असते ती निखळ मानवी करुणा आणि म्हणूनच-
कोणासाठी वारंवार जीव अर्थाचा तुटतो;
कोणासाठी शब्दातून असा अंवुᆬर पुᆬटतो़
कोणासाठी नवी पाने असा हुंकार भरती;
कात टावुᆬनिया जिणे कोरे नवीन करती़
असा हिरवा दिलासा कोणासाठी आणि कोण
आणि मेलेल्या मनाला मिळे पुन्हा जिवंत संजीवऩ
असे संजीवन आणणारे शब्द आम्हाला साधू देत अशी प्रार्थना तुमच्या माक्या सर्वांच्या हृदयात बसलेल्या निर्मिकाच्या पायापाशी करतो़
आपण माझा बहुमान केला आणि माझे शब्द शांतपणे ऐवूᆬन घेतले, त्याबद्दल आपणा सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो़

पत्ता :
प्रा़ श्रीकृष्ण राऊत
शंकर नगर, जठारपेठ,
अकोला़ ४४४००५
फोन : (०७२४) ४२०६७९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा