अरविंद ढवळे - एक गाणारा पक्षी


कोणत्या माणसाला कशाचा छंद असेल, कशाची आवड असेल, कशाचा ध्यास असेल, कशाचं बंड असेल, काही सांगता येत नाही. या मुंग्यांच्या लोंढ्यासारख्या दाट गर्दीतही वाटणारे अती तीव्र एकाकीपण सुसह्य करण्यासाठी तो स्वत:चे मन कशात गुंतवून ठेवीन काही सांगता येत नाही !
चित्रातल्या लयदार रेषा, कवितेतला अर्थगर्भ शब्द आणि गाण्यातला हृदयाला हात घालणारा स्वर कुठेतरी त्याला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. त्यातल्या त्यात एकांत जीवघेणा झाल्यावर आपल्या ओठांवर कुठलं तरी गाणे, पेरलेले बी जसे उगवते का उगवते? त्याचवेळी त्याला कां उगवावेसे वाटते?
कुठला तरी मानसिक ताण सैल करण्यासाठी ते उगवते. कुठले तरी श्रम हलके करण्यासाठी ते उगवते. कुठला तरी थकवा घालण्यासाठी ते उगवतं आणि एखादा ताणलेला स्वर सोडून दिल्यासारखे आपण आतल्या आत कुठेतरी सैल सैल होत जातो. नव्याने धडपडायला लागतो.
तसेच कुठला तरी हर्ष, कुठला तरी आनंद. कुठला तरी रोमांच. कुठला तरी शहारा, कुठली तरी स्पंदने आपल्या ओठावर फुटणार्‍या गाण्यातून आपसुक अभिव्यक्त होत असतात.
उदास, दु:खी, आनंदी, प्रणयी कुठलीही भावना मनाला जेव्हा ताणून धरते, तेव्हा कुठल्यातरी गाण्याच्या, कवितेच्या, भावगीताच्या ओळीतून ती अभिव्यक्त होत जाते आणि मन होत जाते हलके हलके. हवेत स्वैर विहार करणार्‍या पिसासारखे.
किर्र घनदाट जंगलातून, एकाकी वाटेवरच्या प्रवासात असावा एखाद्या गाणार्‍या पक्षाचा स्वर. बस्स !
मग जाणवणार नाहीत आपल्याला ठिकठिकाणी लागणार्‍या विपरीत अनुभवाच्या ठोकरी, रक्तबंबाळ झालेली पायाची प्रामाणिक बोटे कधीकाळी वहाणेतुनही उघड्या राहणार्‍या पायात टोचलेले चतुर काटे आणि शिकारीवर टपून पाळत ठेवणार्‍या धूर्त श्र्वापदाची धास्ती.
काही काsही का sहीच जाणवणार नाही. एकदा त्या गाणार्‍या पक्षाच्या स्वराशी मैत्री झाली की पुढे पुढे आपण त्याच्यासोबत केव्हा गुणगुणायला लागतो हे देखील कळणार नाही. त्याच्या स्वराच्या हातात आपल्या स्वराचा हात असेल आणि एकमेकांच्या स्वरांनी विणलेल्या गाण्याच्या लयीत, एका अनोख्या बेहोषीत एका अलौकिक धुंदीत आपण ताल धरून गात राहू. चालत राहू, चालत राहू, गात राहू. गातच राहू, चालतच राहू अखंड. सतत अविरत सलग पायसंपेपर्यंत.
अशा एका गाणार्‍या पक्षाविषयी मी आधी खूप ऐकले होते. त्या पक्ष्याला भेटण्याची अनावर ओढ लागली होती. त्याच्या स्वराबद्दलचं कुतुहल शिगेला पोहचले होते. त्याचा स्वर कधी एकदाचा ऐकतो असे झाले होते. वास्तविक ते निखळ शास्त्रीय गाणे नव्हतेच. ते होते काव्यगायन ! सुरेश भटांच्या स्वत:च्या चालीत जसेच्या तसे ! पू. ल. नी म्हटल्याप्रमाणे या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखे !
डॉ. मोतीलाल राठींनी अमरावतीला बोलावले होते. त्यांच्याकडे प्रथमच जात होतो. सोबत कुणाला न्यावं ! हा प्रश्न होता. किशोरने नरेशला घेऊन जावू म्हणून लिहिले होते. अमरावतीला गेलो तर किशोर खामगावला गेलेला. दोन दिवसांनी परतणार. आता दोन दिवस इथे काय करावं ? नरेशच्या केशरबाई लाहोटी कॉलेजात नरेश भेटला आणि पुढची वाट मोकळी झाली. नरेशला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडून परतल्यावर संध्याकाळी अरविंद ढवळेंकडे गेलो आणि अपार उत्सुकतेची सांगता झाली. त्या गाणार्‍या पक्ष्याची भेट झाली !
बघतो तर त्यांच्या वहीत माझी गझल माझ्या आधीच पोचलेली ! अक्षर किशोरचे. दुसर्‍या गझलच्या काही ओळी. अक्षर विठ्ठल वाघांचे आणि अरविंद ढवळेंना देखील मला भेटण्याची मनापासूनची इच्छा. या पहिल्याच भेटीत नव्या परिचयातली औपचारिकता व वयातला अंतराय पिकल्या फळासारखा केव्हा गळून पडला काही कळलेच नाही. वर्षानुवर्षाचं दोस्त असल्यासारखे आम्ही बोलत राहिलो. बोलतच राहिलो.
सुरेश भटांच्या चालीत आणि आवाजात तुम्ही एवढे हुबेहुब काव्य गायन करता की, तुम्हाला प्रति सुरेश भट म्हणतात.
ह्य ! प्रती सुरेश भट वगैरे म्हणजे फारच झालं ! अहो प्रतिसुरेश भट होणं एवढं सोपं आहे काय ? सुरेशची कविता मला मनापासून आवडते. मी म्हणतो. एवढंच ! त्याच्यासारखं मला गाता कुठं येतं ? मी प्रयत्न करतो !ङङ 
घ्घ्आणि तो प्रयत्नच एवढा हुबेहुब जमतो की तो आधी ऐकला पाहिजे.ङङ 
घ्घ्मग त्यांनी कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता ऐकवली-
घ्घ्कुठलेच फुल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही.ङङ 
वा ! यावरून मी मनातल्या मनात सुरेश भट कसे गात असतील याची आकृती रेखाटतो आणि कविता संपल्यावर लगेच माझी खंत त्यांना बोलून दाखवित ो.
घ्घ्मी असा एक अतिशय दुर्दैवी माणूस आहे की माझे आवडते कवी असून अजुनही मला सुरेश भटांना प्रत्यक्ष समोरासमोर ऐकता आलं नाही. मागे एकदा रेडिओवर ऐकले होते. मुर्तिजापूरला ते येणार म्हणून विठ्ठल वाघांना घेऊन मुद्दाम गेलो होतो. पण त्यावेळी ते मुंबईला गेल्याने येऊ शकले नव्हते. मी हिरमुसलो. गो. रा. वैराळे, किशोर मोरे, विठ्ठल वाघांकडे नुकतेच येऊन गेल्याचे ते सांगत होते. दोन दिवस राहून गेल्याचे सांगत होते. रात्रभर कविता ऐकविल्याचे सांगितले होते. माझा जीव आतल्या आत तुटत होता. नागपूरात गेल्यावर एकदा त्यांना मी भेटलोही होतो. परंतु कविता ऐकण्याचे भाग्य अजून लाभले नाही.ङङ 
घ्घ्काही हरकत नाही. मी तुम्हाला उद्या सुरेशच्या बर्‍याच कविता ऐकवून देतो. आपल्याकडे त्याच्या नव्या जुन्या अनेक कविता टेप आहेत. तुम्हाला सध्याच ऐकविल्या असत्या पण टेपरेकॉर्डर डॉक्टरकडे आहे.ङङ
नंतर जेवणाचा आग्रह झाला. पत्नी जेवणाची वाट पहात असेल. म्हणून नरेश लगेच निघून गेला. आम्ही जेवण केले आणि पुन्हा बोलत राहिलो. विषय एकच, कविता. त्यातल्यात्यात सुरेश भटांच्या कविता ! घ्घ्रूपगंधाङङ चाळता चाळता बारा केव्हा वाजले काही कळलेच नाही. उरलेले बोलणे. उरलेल्या कविता. उद्यासाठी ठेवून त्यांनी मला स्कुटरवर पोहचवून दिले.
दुसर्‍या  दिवशी सकाळी पुन्हा आमची बैठक सुरु झाली. सुरवातीला आम्ही एकमेकांचे शिक्षण-व्यवसाय-शेती, मैत्री, आवडनिवड इत्यादी विषयी बोलत राहिलो अरविंद ढवळे सांगु लागले -
घ्घ्मी सुरेशची कविता का गातो! हेच कळत नाही. तसा मराठी भाषेचा आणि माझा संबंध नावापुरताच म्हटला पाहिजे. सुरवातीला माझे शिक्षण मॅट्रिकपर्यंत कॉन्व्हेंट मधुनच झाले. त्यानंतर वडील म्हणाले मराठी काय आपलीच मातृभाषा. बी. ए. ला हिंदी मिडीयम घ्या ! आणि मी हिंदी मिडियम घेतले. म्हणून माझा मराठीशी तसा घरोबा नाही. अशावेळी सुरेशचा स्नेह लाभला. त्याची कविता हृदयाला खोल आत कुठेतरी भिडत राहिली आणि ती आपोआप ओठांवर आली. पुढे पुढे तो छंदच जडून गेला. सध्यातर कवितांशिवाय करमेनासे झालं ! दैनंदिन जीवनाचा तो एक भाग होऊन गेला.ङङ 
घ्घ्तसा सुरेश मला कॉलेजमध्ये सिनिअर होता. तो माझ्यापुढे होता. परंतु एकदा दोस्ती झाल्यावर कुठलाच अंतराय ठरला नाही.ङङ 
मी ऐकत होतो आणि मनात विचार करीत होतो की, खरोखर ज्या माणसाला मराठी भाषा आपण बोलतो म्हणून माहीत, त्या माणसाला सुरेश भटांची मराठी कविता, मुखोद्गत असणे आणि एक नाही दोन नाही तर घ्घ्रूपगंधाङङ ते घ्घ्रंग माझा वेगळाङङ आणि त्यानंतर दरवर्षीच्या दिवाळी अंकातून प्रसिद्घ होणार्‍या गझला आणि त्याही नुसत्या तोंडपाठ नव्हेत तर सुरेश भटांच्या ओरिजिनल चालीत ही खरी काव्यास्था ! अजून कवितेचा असा रसिक मी पाहिला नाही ! कवितेवर एवढे निस्सीम प्रेम करणारा माणूस मला अजून मिळाला नाही !
अरविंद ढवळे पुढे सांगत होते, घ्घ्अमरावती ते नागपूरचा प्रवास कारने करावयाचा असला तर सुरेशची कविता सोबतीला असते. त्यावेळी जुन्या कवितांची खूप रिव्हिजन होते. एकामागून एक कविता लागोपाठ सुरु. मजा येते.ङङ 
नंतर त्यांनी सुरेश भटांच्या भिंत खचली कधी, अद्यापही सुर्‍याला ही शूरकाचपात्रे, हा ठोकरून गेला, जगत मी आलो असा, चांदण्यात फिरतांना, मालवून टाक दीप. पुर्तता माझ्या व्यर्थची, गीत गंगेच्या तटावर, मग माझा जीव, उष:काल होता होता, अशा नव्या जुन्या अनेक कविता ऐकविल्या. माझ्यासाठी कवितेची ही नादमय मेजवानीच होती. ऐकून मी तृप्त झालो.
सुरेश भटांच्या कविता ऐकल्या. माझी कविता ऐकवूच नये असे वाटत होते. कारण एक तर मला गाता येत नाही आणि दुसरे सुरेश भटांच्या कवितेपुढे आपली कविता काय ऐकवणार ? तरी त्यांच्या आग्रह धरून मी त्यांना काही कविता ऐकविल्या. त्यांनी हाक मारून सौ. मीना वहिनींना बोलावून घेतले. कविता संपल्यावर त्यांना एक पेटेन्ट शब्द दाद देवून जातो-
घ्घ्खौफनाकङङ वा ss ! वा s ! कृष्णराव तुमच्याही कविता खौफनाक आहेत बुवा !ङङ त्यांनी खौफनाक म्हटल्यावर त्यांची हिंदी मिडियम होती याची खात्री पटली. वयाने माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या अरविंद ढवळेंनी मला कृष्णराव म्हणावे हे मात्र कसेसेच वाटले. खरे म्हणजे मीच त्यांना अरविंदराव म्हणावयाला हवे होते.
पल्लवी... काव्य गायनाला सरावलेली त्याची मुलगी. कविता ऐकून घेतल्यावर म्हणाली, घ्घ्काका कविता काय म्हणता? गाणं म्हणा.ङङ आणि माझी पंचाईत झाली.
तेवढ्यात अरविंद ढवढे म्हणाले, घ्घ्अहो ती सांगू कशी फुलांचा देठास भार झाला.ङङ ऐकवा. विठ्ठलकडून अर्धवटच ऐकली होती मी त्यांना ऐकवली. तसे ते पल्लवीला म्हणाले, घ्घ्बेटा तू, मोठी झाली ना म्हणजे तुला काकांची कविता कळेल!ङङ 
आणि मी चाट पडलो. अरविंदराव खरोखर तुम्ही ग्रेट आहात बुवा ! अहो श्रृंगारिक कवितेबद्दल आपल्या पोरीला असं सांगणार्‍या माणसाच्या काव्यप्रेमाला दाद देण्यास माझ्याजवळ शब्द नाहीत. मी फक्त एवढेच म्हणू शकेन, घ्घ्याला म्हणायच काव्यप्रेम ! याला म्हणायची काव्यनिष्ठा!ङङ 
नंतर मी त्यांना नारायण कुळकर्णीचं घ्घ्एका सामान्याचे स्वगतङङ आणि घ्घ्नंदीबैलङङ ऐकविले. या मुक्तछंदाच्या कवितांनाही त्यांनी दिलेली दाद खरोखर वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या अभिजात रसिकतेची मला झालेली जाणीव अधिक ञ्ृढ होत होती. आयुष्याची गुंतागुंत, जगण्याचे सुख, दु:ख, माणसाचा स्वार्थ, सतत संघर्ष, अखंड वॅरीनियती इत्यादींचे एकेक सदर मी त्यांच्या पुढे उकलीत गेलो. त्यांच्या डायनिंग टेबलवर तर मी आत्महत्येच्या गोष्टी बोललो. त्यांनी Milton on his blindness ही कविता वाचावयास सांगितली. आचार्य रजनीश वाचायला सांगितला, 
त्यानंतर लगेच अनायास माझ्या हातात Milton to his blindness. ही कविता पडली आणि मी मला सावरत गेलो. सावरत चाललो.
अरविंदराव, तुम्ही दिलेली आयुष्याची समज, तिने दिलेले असामान्य धाडस मी व्यक्त करू शकत नाही.
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही नरेशला घेऊन डॉ. मोतीलाल राठींकडे सुरेश भटांच्या कविता टेपरेकॉर्डरवर अडीच ते तीन तास ऐकल्या. कविता ऐकताना अरविंद ढवळेंनी सुरेश भटांचे काव्य गायन तंतोतंत त्यांच्याच आवाजात आणि चालीत आत्मसात केल्याची खात्री पटली आणि अरविंद ढवळे या अभिजात रसिकांचा मनावर उमटत चाललेला ठसा अधिक ठसठसीत होत होता अमिट झाला.
आता कालपरवा घनवटे रंग मंदिरात घ्घ्रंग माझा वेगळाङङ या कार्यक्रमात सुरेश भटांनी अरविंद ढवळेंचा रसिक म्हणून केलेल्या जाहीर सत्काराबद्दल वाचणत आले. कदर झाली ! आज पुन्हा माझ्या डोळ्यापुढे अरविंद ढवळे गात आहेत.
कुठलेच फुल आता
मला पसंत नाही
कळते मला अरे हा
माझा वसंत नाही
हा वसंत जरी सुरेश भटांचा, अरविंद ढवळेंचा आणि माझाही नसला तरी खंत नाही. या वसंतास भेटलेला एक सच्चा स्वर एक गाणारा पक्षी. त्याने दिलेले गाणे भरारी मारण्याचे सामर्थ्य, घरट्याबाहेरची हवा. घरट्यातील आनंद लुटण्याची शिकविलेली तर्‍हा आणि बरेचसे शब्दातीत मी कसा विसरू? मी तर गुणगुणायला लागलोय -
आज मी जे गीत गातो
ते उद्या गातील सारे
चालू दे वक्षात माझ्या
वादळांचे येरझारे 
प्रा. श्रीकृष्ण राऊत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा